पाचगणी : पाचगणीच्या भिलार वॉटर फॉल पॉईंटवर पर्यटकाची कार कनसाच्या स्टॉलला धडक देऊन दरीत कोसळली. यामध्ये कनिस विकणाऱ्या स्टॉल धारकासह भविष्यवाणी सांगणारा व्यक्ती व एक पर्यटक असे एकूण तीन जण जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारमधील असणारे चार पर्यटक बचावले आहेत. कार दरीत कोसळल्यानंतर झाडात जाऊन अडकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सायंकाळी सहाच्याच्या सुमारास ही घटना घडली. पाचगणीवरून महाबळेश्वरच्या दिशेने ही कार चालली होती. पांगारे फाट्यावर आल्यानंतर कारचालकाचा ताबा सुटल्यानंतर थेट कार भिलार वॉटर फॉलच्या पॉईंटवरून रस्त्यालगत कनिसाच्या स्टॉलवर जाऊन आदळली. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. स्टॉल धारक महिला अंजू नरेश लोहारा. भविष्यवाणी करणारे गौरव दीपक गोंडे, तर कनसाच्या स्टॉलवर उभे राहिलेल्या पर्यटक सुनिता बरकडे (रा. नांदेड) जखमी झाले.
कारमधील सर्व पर्यटक सुरक्षित
स्टॉलला धडक लिहिल्यानंतर ही कार दरीत कोसळली सुदैवाने मोठी जीवितहानी कोणतीही झाली नाही. स्टॉलला धडक गेल्यानंतर कार दरीत कोसळली. सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही. कारमध्ये बसलेले सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी िदली. पुण्यावरून महाबळेश्वर फिरण्यासाठी आलेल्या कुटुंबाच्या कारचा अपघात झाला.