File Photo : Drowning in Water
पालघर :केळवे समुद्रकिनाऱ्यावर (Kelwe Beach) ६ जण बुडाल्याची माहिती मिळाली आहे. पालघरच्या (Palghar) केळवे समुद्रकिनाऱ्यावर बुडालेल्या ६ जणांपैकी (6 People Drowned In Kelwe Beach) चौघांचा मृत्यू झालाय, एकाला वाचवण्यात स्थानिकांना यश आलं आहे. तर एकजण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. जे सहा जण बुडाले त्यापैकी ४ जण बाहेरील आहेत. तर २ जण स्थानिक लहान मुलं असल्याची पोलिसांची माहिती आहे. बेपत्ता असलेल्या तरुणाचा स्थानिक, मच्छीमार यांच्याकडून शोध मोहीम सुरु आहे.
[read_also content=”जगात आहे एक असा देश जिथे सामोसा खाण्यावर आहे बंदी, कारण ऐकाल तर तुम्हाला बसेल धक्का https://www.navarashtra.com/world/samosa-eating-banned-in-somalia-country-nrsr-248622.html”]
पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या केळवे येथील स्थानिक वास्तव्यास असलेली दोन लहान मुलं समुद्रात पोहायला उतरली होती. मात्र, समुद्राला ओहोटी असल्याने ही मुलं बुडू लागली. तेव्हा नाशिक येथून आलेल्या एक मोठ्या ग्रुपमधील चौघांनी समुद्रात उड्या घेतल्या. हा ग्रुप पर्यटन स्थळी मौजमजा करण्यासाठी आला होता.
दोन मुलांना वाचवण्यासाठी समुद्रात उड्या घेतलेल्या चौघांपैकी दोघेजणही बुडाले. या दोघांचे मृतदेह सापडले असून बाकीच्यांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. या घटनेत चौघांचा मृत्यू (Death) झालाय तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे. तर, एकजण अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक व्यवसायिक आणि स्थानिक मच्छिमार मंडळी प्रयत्न करत आहेत. सध्या घटनास्थळी पोलिसांची फौज पोहोचली असून दोघांचा मृतदेह शोधण्याच काम सुरु आहे.