जांभूळाचे उत्पन्न घटणार : जांभूळ उत्पादक शेतकरी, विक्री करणाऱ्या महिला संकटात
निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व वातावणातील बदल तसेच अवकाळी पाऊस याचा यंदा पुन्हा एकदा आंबा व काजू उत्पादना बरोबरच काळया भोर रानमेवा असलेल्या जांभूळ पिकावरही झालेला असून त्याचा परिणाम दिसून येत आहे. या वर्षी उशिराने जांभूळ पिकले असून, जांभूळ हंगामा उशिराने सुरु झाला आहे.
गावरान जांभुळ अद्यापही में महीना आला तरी पाहिजे त्या प्रमाणात जांभळे पिकले नसल्याने जांभळाची प्रतिक्षी जुनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी लागेल. यामुळे विक्रमगड परिसरातील नागरिक जांभळाची प्रतिक्षा करीत आहेत. त्यातच गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळवारा यामुळे जांभूळ पिकावर मोठा परिणाम झाला असून, तयार व्हायला आलेली जांभळे गळून गेली आहेत. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणातजांभूळ बाजारात दाखल झाली नाहीत. दरवर्षी हा गावरान जांभळे बाजारात येताच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत असते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे हंगाम लांबत चालेला आहे. त्यात अवकाळी पाऊस त्यामुळे जांभुळ उत्पादन हवे आहे ते होत नसुन त्याला पिकण्याचा उत्पादनाचा कालवधी लांबत जाउन जुन उजाडतो व जांभळे खराब होउन शेतकऱ्यांना बागायतदारांना नुकसान सहन करावे लागते.
साधारण पणे जानेवारी महिन्यात जांभळांच्या झाडांना मोहर येत असतो. परंतु यंदा मोहर लांबला तसेच मोहर गळला फळधारना झाल्यावर लहान कळी गळून पडले, असे अनेक नुकसान दायी प्रकार घडले. त्यामुळे जांभळाच्या उत्पादनास जुन उजाडणार व पावसाला सुरुवात झाली म्हणजे जांभळाचे भाव पडलेले असतात, जांभळे खराब होवुन अखेर फेकून द्यावे लागणार आहेत, अशी परिस्थिती येणार आहे.
जांभळाचे उत्पादनासाठी पोषक वातारण मिळत नसल्याने गावरान जांभळे यावशींही दुर्मिळ झालेला आहे. गेल्या दोन-चार वर्षांपासून जुनी जांभळाची झाडेही कमी झालेली आहेत. शिल्लक राहिलेली झाडेही फारशी उपयुक्त ठरताना दिसत नाहीत.
में व जुन या उन्हाळी दोन महिन्यांतव हा व्यवसाय चालत असतो, बागयतदारांना जांभुळ पिकापासून या दोन महिन्यांत ४० ते ५० हजारांचे उत्पन्न मिळते. तर आदिवासी खेड्यापाड्यातील जंगल भागातील महिला भरलेल्या जांभळाच्या टोपल्या विकून याच दोन महिन्यांत १५ ते २० हजार रुपये कमवत असतात.
परंतु, बंदा रोजगार हिरावला आहे. दिक्स उगवला का पहाटेच या महिला परातून निघून शहराकडे जांभळे करंडधात भरून विकण्यासाठी वसई-विरार, नालासोपारा, मीरा-भायंदर, पालघर, कल्याण, भिवंडी या मोठ्या शहरांकडे जात असतात.
पूर्वीच्या प्रमाणात झाडांची लागवड आता केली जात नाही. नवीन जातीच्या झाडांना फारशी वाढ नाही.
त्यामुळे गावरान जांभाळाया पहिल्याप्रमाणे आस्वाद घेणे दुर्मिळ झालेले आहे. या वर्षी हवामानातील बदल आणि अवकाळी पाऊस यामुळे आंबा काजू उत्पादनाप्रमाणेच जांभळालाही उशिराने मोहर आला. त्यामुळे हंगाम उशिराने सुरु झाला असून जांभळाचे उत्पादन व मिळणारा पैसा येथील बागायदारांना कमी मिळणार आहे.
जांभुळ व्यवसाय वातावरणातील होत असलेला सततच्या बदलामुळे फक्त मे महिन्याचा शेवटचा आठवडा व जनच्या सुरुवातीला चालणार असल्याने शेतकऱ्याऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.