सोलापूर – लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. देशभरातील एकूण 94 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. सांगोल्यामधील बागलवाडी येथील मतदान केंद्रावर इव्हीएम मशीन जाळल्याचा प्रकार घडला आहे. मतदान केंद्रावरील उपस्थित अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बागलवाडी येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर येथील ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न केला गेला. ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव दादासाहेब तळेकर असल्याची समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात अधिकची माहिती घेत असून मतदानावर कोणतेही प्रभाव झाले नसल्याचा दावा केला जात आहे. नवीन ईव्हीएम आणून मतदान प्रक्रिया पुन्हाने सुरू करण्यात आली आहे.
दादासाहेब तळेकर हे दुपारी मतदान करण्बासाठी आले होते, तेव्हा त्यांनी ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न केला. मतदान करण्यासाठी येताना दादासाहेब तळेकर याने एका छोट्या बाटलीत पेट्रोल भरून आणलं होतं. पेट्रोलची ही छोटी बाटली त्याने आपल्या खिशात लपवून आणली होती. दादासाहेब चळेकर याने ईव्हीएमवर पेट्रोल टाकलं आणि मशीनला आग लावली. यामुळे ईव्हीएम पूर्णपणे खराब झाल्याने तेथे नवीन मशीन आणून फेरमतदान केले जात आहे. या गावात साधारण १३०० मते असल्याचं सांगितलं जात आहे.