कणकवलीत रूग्णाचा मृत्यू (फोटो- istockphoto)
डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळेरूग्णाचा मृत्यू
कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील घटना
वैद्यकीय अधिकाऱ्यांना घालण्यात आला घेराव
कणकवली: प्लेटलेट्स व ब्लडप्रेशर कमी होऊनही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अॅडमिट न करता केवळ गोळ्या औषधे देऊन घरी पाठवेलल्या राजेंद्र बळीराम गावडे (५३, रा. वागदे) यांचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या वागदे ग्रामस्थांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत रुग्णालयातील डॉक्टारांना धारेवर धरले.
राजेंद्र यांच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या त्या महिला डॉक्टरवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणारनाही, असा पवित्रा घेत रुग्णालयात परिसरात चार तास ठिय्या मांडला. त्यामुळे रुग्णालयातील वातावरण तंग झाले होते. व्घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे हे रुगालयात दाखल झाले. पाटील, डॉ. इंगळे यांनी ग्रामस्थ व मृत राजेंद्र यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली.
कुटुंबीयांची आर्थिक मदत देण्याची मागणी
या घटनेनंतर वागदे सरपंच संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगावकर, माजी नगरसेवक सजय कामतेकर, भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, रुपेश आमडोस्कर, समीर प्रभुगावकर, शिवा परब आदीसह ग्रामस्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल होऊन वैद्यकीय अधीक्षक विशाल रेड्डी आणि अन्य डॉक्टर घेराव घालून जाब विचारला. त्यानतर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सुबोध इंगवले हे चर्चेसाठी आले, त्यावेळी ग्रामस्थांनी त्या महिला डॉक्टरवर कारवाई करा, त्याचबरोबर या घटनेत दोषी असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करा. तसेच गावडे कुटुंबियांनी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने सरपंच संदीप सावंत, संजय कामतेकर, अण्णा कोदे, रुपेश आमडोस्कर यांनी केली.
घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच झाला मृत्यू
दरम्यान, गावडे यांच्या मृत्यूप्रकरणी पालकमंत्री नितेश राणे यांनी वैद्यकीय अधिकारी व माजी नगरसेवक संजय कामतेकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे राजेंद्र गावडे या रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाची प्रकृती गंभीर असताना प्राथमिक तपासणीनंतर घरी पाठवले, रुगण घरी पोहोचताच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या
ग्रामस्थांनी घेराव घालत माणसाचा जीव गेला, त्याला जबाबदार कोण? त्यांना आधार कोण देणार? झालेले नुकसान कसे भरुन येणार? यासह विविध प्रश्नांचा भडिमार डॉक्टरांवर केला. जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.






