मुंबई : सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी पोलीस स्टेशन परिसरात गोळीबार (Firing) केल्याचा आरोप ठाकरे गटातील (Thackeray Group) कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, चौकशी सुरू आहे. या वादात नारायण राणे (Narayan Rane) यांनी उडी घेतली असून त्यांनी सदा सरवणकरांची भेट घेतली. याबाबत राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला.
नारायण राणे आणि सदा सरवणकर यांच्यात १५ ते २० मिनीटे चर्चा झाली. मी कोणत्याही गोंधळाला आलो नाही. सदा सरवणकर हे माझे मित्र आहेत. झालेल्या घटनेबाबत विचारपूस करण्याच्या हेतूने त्यांची भेट घेतली असे त्यांनी सांगितले. सरवणकर यांनी गोळीबार केली, यामध्ये कितपत तथ्य आहे? असा सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी तक्रार दिली आहे. पोलिस याबाबत चौकशी करतील. फायरिंग झाली असेल तर आवाज येतो. मातोश्रीच्या दुकानात बसून तक्रारींचे मार्केटिंग करण्याशिवाय दुसरे काही काम उरलेले नाही, अशी टीकाही राणे यांनी केली.
हल्ले-बिल्ले करु नका, मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचे फिरायचे ना? परवानगी घ्यावी लागेल. पक्षाचा प्रश्न नाही, मित्र आहे म्हणून आलो. आमची युती आहे, युती धर्मानुसार एकमेकांच्या मागे दोघांची ताकद असतेच. ५० जण एकावर हल्ला करायला आले, त्यासाठी अजामीनपात्र कलम ३५४ लागतो, असेही राणेंनी सांगितले. तसेच, आमची युती आहे. आणि युतीचा धर्म पाळण्यासाठी मी सरवणकरांची भेट घेतली, असेही त्यांनी स्पष्ट केले.