कशेडी बोगद्याचे काम लवकरच पूर्ण? (फोटो सौजन्य - भारत रांजणेकर)
पोलादपूर: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सायंकाळी 7 च्या सुमारास कशेडी बोगद्याच्या पाहणी करत आजपर्यत करण्यात आलेल्या कामाची माहिती घेत मार्च 15 पर्यत दुसऱ्या बोगद्यातून वाहतूक सुरू होवी या बाबत सूचना दिल्या त्याच प्रमाणे पहिल्या बोगद्यातीळ गळतीचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल त्यासाठी लागणारे सहकार्य सह पर्याय रस्ते पाहिले पूर्ण करावेत जेणे करून वाहतूक कोंडी होणार नाही अशा सूचना महामार्ग विभाग सह ठेकेदार कर्मचारी वर्गाला दिल्या आहेत
2010 पासून सुरू झालेला प्रकल्प जलद गतिने होणे गरजेचे होते मात्र अनेक अडचणी आल्या ठेकेदार बडलण्यात आले अशी खंत व्यक्त करत सदरचा मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्णत्वास जावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वतः लक्ष देऊन आहेत येत्या पावसाळ्या पर्यत सदरचा मार्ग पूर्ण होईल अशा आशावाद व्यक्त केला.
कशेडीच्या दुसऱ्या बोगद्याची पाहणी
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील १० पंखे बसवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. बोगद्यात २४ तास वीजपुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने ११ केव्ही वीज देण्याचा प्रस्ताव. यापूर्वीच महावितरणकडे पाठवला होता या प्रस्तावाची माहिती घेत ना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सहकारी वर्गाला पाठपुरावा करावं जेणे करून विद्युतीकरण चे काम मार्गी लागेल यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची वेळ घेत या बोगद्याच्या उद्घाटन शुभारंभ करण्या बाबत वेळ घेता येईल असे सूचित केले
Raigad News: पर्यावरण प्रेमींचा स्तुत्य उपक्रम ; प्लॅस्टिकमुक्त माथेरान करण्याची शासनाकडे मागणी
पत्रकारांच्या प्रश्नांना गेले सामोरे
या वेळी पत्रकार याच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना पर्यायी रस्त्यांसह जुना मार्ग आणि नवीन मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही, त्याचप्रमाणे पोलादपूर शहरातील स्कायवॉकबाबत महामार्गासह सार्वजनीक बांधकाम विभाग मार्फत चर्चा करत हा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे सर्व्हिस रस्त्यांबाबत ज्या समस्या आहेत त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
याशिवाय ज्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे आणि ज्यांनी मोबदला घेऊनही जागा सोडली नाही अशा धारकांवर दोन्ही जिल्ह्याच्या प्रशासन आणि पोलीस महामार्ग विभागामार्फत पाहणी करत कारवाई करावी अशा सूचना यावेळी केल्या
Raigad News: माजी आमदाराचे कर्जत पोलीस ठाण्यासमोर आंदोलन,नेमकं प्रकरण काय ?
काय आहे सद्यस्थिती
सद्यस्थितीत कशेडीच्या एका बोगद्यातील दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू आहे. तर दुसऱ्या बोगद्यात कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासह भोगावनजीक अपूर्णावस्थेतील पुलाची कामे, पंखे बसवण्याच्या कामांसाठी सलग ५ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दौऱ्यात बहुतांशी मार्ग पूर्ण होत प्रवास सुखाचा होईल अशा आशावाद प्रवासी वर्गाला वाटू लागला आहे






