नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Local Body Elections : नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे भाजप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली असताना दुसरीकडे काँग्रेसने मतांचे विभाजन टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. यामध्ये ६१ जागा लढवत २० जागा वंचित आघाडीला देण्याचा निर्णय घेतला आहे. युती फिस्कटली… आघाडी जुळली… असे राजकीय चित्र मंगळवारी नांदेडात दिसून आले.
अनेक निष्ठावंतांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे या निष्ठावंतांनी आपला मोर्चा शिवसेना, राष्ट्रवादीकडे वळवत आपली उमेदवारी पक्की केली. भाजप, शिवसेना, काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता, भाजप व शिवसेनेची युती व्हावी, यासाठी दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या होत्या. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे मनपा निवडणुकीचा किल्ला लढवत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप, शिवसेनेची युती जागावाटपावरून फिस्कटली.
हे देखील वाचा : आता गुन्हा केल्यावर शिक्षा नाही? दिल्ली सरकारने केले ‘हे’ विधेयक मंजूर; नेमका प्रकार काय?
शिवसेनेला किमान ३० जागा मिळाव्यात अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली होती, आ. बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर हे युतीसाठी आग्रही होते, परंतु आमदार हेमंत पाटील यांनी युतीबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही, राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती व्हावी, अशी इच्छा शिवसेनेच्या एका गटाची होती. अखेर युती फिस्कटल्यामुळे भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
भाजपने उमेदवारांची नावांची घोषणा केल्यानंतर लगेच नांदेड उत्तर भागातील ४१ तर नांदेड दक्षिण भागातील २९
उमेदवारांच्या नावांची घोषणा शिवसेनेने केली आहे. उत्तर भागातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आल्याची माहिती आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिली आहे. काँग्रेसच्या उमदेवारांची यादी जाहीर झाली असून अनेक जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरेंवर अन्याय? आरोप होताच संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
वंचितला फक्त २० जागा
काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत जुळवून घेत ६१ जागा लढविण्याचा निर्णय घेतला असून वंचितला २० जागा दिल्या आहेत, या आघाडीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मनपा निवडणूक प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची देखील कोण्याच पक्षाशी युती झाली नसून त्यांनीही स्वबळाचा नारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांनी राष्ट्रवादी युतीबाबत अजून आशावादी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी युती न होण्याचे खापर दक्षिण, उत्तरच्या शिवसेना आमदारांवर फोडले आहे.






