फोटो - सोशल मीडिया
गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विरोधकांवर टीका केली. ‘आमच्या विरोधकांना पोटदुखी होत आहे. त्यामुळे आमच्या चांगल्या योजनेवर टीका करत आहेत. ‘लाडकी बहीण योजना’ ही कायमस्वरूपी योजना असून, अशा अनेक योजना आमच्या सरकारने काढल्या आहेत’, असे ते म्हणाले.
हेदेखील वाचा : दोन्ही पलटूराम मोदी सरकार पाडणार; राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी अध्यक्ष कॅप्टन यादव यांचा दावा
माध्यमांशी संवाद साधताना पटेल यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘नवाब मलिक हे आमचे आधीपासूनच सहकारी आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर निवडणूक जिंकली आहे. नवाब मलिक घड्याळ चिन्हाचे वापर करणे काही आश्चर्याची गोष्ट नाही. सकाळच्या साडेनऊच्या भोंग्याला मी उत्तर देत नाही’.
दरम्यान, कॅबिनेटमध्ये वाद आहे का? यावर ते म्हणाले, ‘या वादाची बातमी काल्पनिक असू शकते. महायुतीत कुठेही वाद नाही. महायुती एकदम घट्ट आहे. महायुती आम्ही तिन्ही पक्षाच्या निर्णयाने काम करतो.
हेदेखील वाचा : ऑनलाईन ऑर्डर केलं 32 हजार रुपयांचं घड्याळ; पण अशाप्रकारे झाली ग्राहकाची फसवणूक