बच्चू कडू यांची सरकारवर टीका (फोटो- सोशल मिडिया)
सोलापूर: आज माजी राज्यमंत्री आणि प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत पाकिस्तान संबंध, महायुती सरकार, लाडकी बहीण योजना, प्रहार पक्षाचे आंदोलन, राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष एकत्रित येणाच्या विषयांवर भाष्य केले आहे. बच्चू कडू नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.
प्रहार पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, ” पाकिस्तान नेहमीचे दुखणे आहे ते बंद केले पाहिजे. एकसारखे पाकिस्तान आपल्या कुरापती काढत असतो. जसे इंदिरा गांधी यांनी बांगलादेश वेगळा केला, तसाच आपण पाकिस्तान भारतात घ्यावा. त्यासाठी जर सैनिक कमी पडत असतील, तर प्रहारचा कार्यकर्ता आणि बच्चू कडू तयार आहेच.”
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दोन्ही गट एकत्रित येण्यावरून बोलताना बच्चू कडू म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्रित आल्या तरी जनतेचे काय भले होणार आहे. राष्ट्रवादी कधी वेगळी होती? पवार साहेब आणि अजित दादा हे वेगळे होते हे शक्य आहे का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच होत्या.”
कसे असणार प्रहारचे आंदोलन?
येत्या २ जूनपासून आमचे आंदोलन सुरू होईल. ३ जून रोजी बारामतीमध्ये आमची सभा होईल. ७ जून रोजी नागपूरकडे कूच करणार आहोत. त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत. बावनकुळे म्हणतात 5 वर्षात आम्ही कधीही कर्जमाफी करू. सरकार जनतेला फसवण्याचे काम करत आहेत.”
लाडकी बहीण योजना
महायुती सरकारच्या महत्वाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बच्चू कडू बोलले आहेत. निवडणुकीत लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणार आहे असे सांगितले मात्र अजून हे १,५०० वरच अडकले आहेत. सरकारला लाडका शब्द हा कडवट होत आहे. लाडक्या बहिणीवर आणि लाडक्या शेतकऱ्यांवर ही राज्य सरकारचे लक्ष नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बारामतीतून आंदोलन करणार आहोत.”
विजय वडेट्टीवारांची भाजपवर सडकून टीका
कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार अवकाळी पावसावर बोलताना म्हणाले, “अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान आहे. पान नुकसणीचे पंचनामे करून अहवाल देण्याचे निर्देश अजून सरकारने दिलेले नाहीत. इतकं नुकसान होउनही शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार का? समजून घेत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन रब्बी पिकांच्या नुकसणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत देण्याची मागणी आम्ही करणार आहे.”
Vijay Wadettiwar: विजय वडेट्टीवारांची भाजपवर सडकून टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीची भूमिका भाजपच्या…”
“भाजपची नीती वापरा आणि फेका अशी आहे. एका पक्षाचा वापर झाला असेल त्यामुळे दुसरा पक्ष सोबत घ्यायचा, याच्यामध्ये राजनीती स्पष्ट आहे. शरद पवारांची भूमिका काय आहे यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही. एकूणच राष्ट्रवादीची भूमिका भाजपच्या डावपेचाचा भाग आहे.राष्ट्रीय पक्ष कमकुवत झाला की प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम करतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रमुख नेते जाणार आहेत. त्या बैठकीत निवडणूक कशी लढायची यावर चर्चा होईल,असे विजय वडेट्टीवार म्हणाले.