उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री अडीज वर्षे असताना कोकणासाठी काहीही करु शकले नाहीत. प्रकल्पांना कोकणातील रोजगार या ठाकरे आणि विनायक राऊत यांनी बुडवून तरुणांचे नुकसान केले. त्यामुळे जनतेने येणाऱ्या निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांना समुद्रात बुडवावे. रोजगार नाहीत म्हणून इथल्या मुलांसोबत मुली लग्न करीत नाही. त्यामुळे प्रकल्पांना विरोध करणाऱ्या ठाकरेंनी कोकणात येऊन भुलथपा मारु नयेत, असा टोला माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषद
प्रत्येक गोष्टीत खासदार विनायक राऊत आणि त्यांचा पक्ष विरोध करतात, त्याला आम्ही काय करणार? वाकड्या तोंडाचा खासदार बसवला पाहिजे. नवीन कुठलाही प्रकल्प आली की, शिवसेना उबाठा खासदार विनायक राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आम्हाला विश्वासात घ्या म्हणतात, म्हणजे आम्हाला पैसे द्या. रोजगार नसल्याने ८० टक्के घरे बंद आहेत. रिफायनरी प्रकल्प व्हावा असा आमचे प्रयत्न आहे. मात्र, एकदा खासदार विनायक राऊत यांना विचारले, तुम्ही अभ्यास केला आहे का? त्यावर ते म्हणाले लोकांना नको त्याला आमचा विरोध राहील. आ. राजन साळवी, आदित्य ठाकरे सांगत आहेत हा प्रकल्प हवा. उद्धव ठाकरे यांनी पत्र दिलं, मग राऊतांचे काय? म्हणून त्यांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असल्याचा आरोप प्रमोद जठार यांनी केला.
राम भक्तांसाठी ७ फेब्रुवारीला पनवेल येथून ट्रेन
८ फेब्रुवारीला रात्री १० वाजता पनवेल रेल्वे स्थानक येथून सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसाठी कार्यकर्ते आणि रामभक्त यांना दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी २५० प्रमाणे १५०० लोकांना घेऊन अयोध्या राम मंदिरात महाआरती करण्यात येणार आहेत.
आम्ही अयोध्या श्रीराम मंदिरात गुलाल उधळीत वाजत – गाजत जाणार आहोत. त्या ट्रेनचा प्रमुख मी आणि स्थानिक नेते असणार आहेत. विधानसभा प्रमुख सावंतवाडी राजन तेली, कणकवली आ. नितेश राणे, कुडाळ निलेश राणे, रत्नागिरी बाळ माने या नेत्यांकडे जबाबदारी आहे. या गाडीला हिरवा झेंडा पालकमंत्री रविंद्र चव्हाण दाखवणार असल्याचे श्री. जठार यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, कोल्हापूर या भागातील काजू बियांना 200 रुपये हमी भाव द्यावा, यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही यशस्वी झालो. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, उदय सामंत यांना भेटलो. अन्य मंत्र्यांनाही भेटलो. सामूहिक मंत्री उपस्थित असताना ही बैठक लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी विंनती केली आहे. ही बैठक पुढच्या आठवड्यात होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून काजू बी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. शेतकऱ्यांना येणारा उत्पादन शुल्क लक्षात घेऊन सरकारने हमी भाव द्यावा, भावांतर म्हणून तरतूद करावी.