पुणे महानगरपालिकेचा जायका प्रकल्प (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: शहरातील सांडपाणी व मैलापाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडण्यासाठी सुरु असलेल्या ‘जायका’ प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून महापािलकेला शंभर काेटी रुपयांचा निधी मिळाला आहे. हा प्रकल्प पुर्ण हाेण्याची मुदत संपत असुन, ती एक वर्षाने वाढवावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
सांडपाणी आणि मैलापाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी महापािलकेने जपान इंटरनॅशनल को ऑपरेटिव्ह एजन्सी (जायका) च्या सहकार्याने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे आत्तापर्यंत ७० ते ८० टक्केच काम झाले आहे.
शहरात दररोज 1750 एमएलडी पाण्याचा वापर होतो. त्यातील 1400 एमएलडी मैलामिश्रित पाणी निर्माण होते. या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने शहरात विविध ठिकाणी 9 मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बांधले आहेत. या एसटीपी प्रकल्पामध्ये दररोज 367 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. हे पाणी प्रक्रिया करून नदीत सोडले जाते. तर उर्वरित मैलामिश्रित पाणी थेट नदीत मिसळते.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प राबविण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पासाठी जायका कंपनीने केंद्र शासनाच्या माध्यमातून महापालिकेला ८५० कोटीचे अनुदान दिले आहे. सदर अनुदान हे टप्प्या टप्प्याने महापािलकेला मिळत असुन, यातील शंभर काेटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारमार्फत पुणे महापािलकेकडे जमा झाला आहे.
ओढे, नाल्यांवरील पाण्यावर प्रक्रिया
या प्रकल्पांतर्गत आंबील ओढा, भैरोबा नाला, माणिक नाला, कोथरूड, वारजे आणि हडपसर नाला या शहरातील प्रमुख सहा ओढे व नाल्यांमधील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी विठ्ठलवाडी, नायडू (जुना), नायडू (नवीन), भैरोबा नाला, मुंढवा, खराडी, तानाजीवाडी, बोपोडी, बाणेर, कोथरूड आणि कृषी महाविद्यालयातील बोट्यानिकल गार्डन या ११ ठिकाणी एसटीपी प्रकल्प, ५५ किलो मीटर मैलापाणी वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत 10 एसटीपी प्रकल्पांची कामे सुरू असून बोट्यानिकल गार्डन येथील काम अद्याप सुरू झालेले नाही.
“नदीचे पात्र कमी होऊन मानव निर्मित…”; नदीकाठ सुधार याेजनेसंदर्भात खासदार मेधा कुलकर्णींचा इशारा
एसटीपी प्रकल्पाची कामे ८० टक्केच पूर्ण
प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याची मुदत मार्च २०२५ पर्यंत आहे. ही मुदत संपण्यास जेमतेम तेरा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या एसटीपी प्रकल्पांची कामे आत्तापर्यंत ७० ते ८० टक्केच पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या कामाला आणखी आणकी एक वर्षाची म्हणजे मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
नदीकाठ सुधार याेजनेसंदर्भात खासदार मेधा कुलकर्णींचा इशारा
राम नदी आणि मुळा – मुठा नदीकाठ सुधार याेजनेसंदर्भात विभागीय आयुक्त डाॅ. महेश पुलकुंडवार यांच्याबराेबर लवकरच संयुक्त बैठक हाेणार आहे, अशी माहिती राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे. पुण्यातील नदी सुधार योजनेच्या ४४ किलोमीटर कामातील राम नदी – मुळा नदी संगम येथील जागेची संयुक्त पाहणी खासदार कुलकर्णी यांनी केली. यावेळी महापािलका आयुक्त राजेंद्र भोसले , जीवित नदी संस्थेचे पुणे रिव्हर रिव्हर्सल संस्थेचे शैलजा देशपांडे व अन्य पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.