मनसेतर्फे आरोग्य अभियानाचे आयोजन
पुणे: रक्तदान हे श्रेष्ठदान समजले जाते. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुण्यात समाजातील आर्थिक कारणांमुळे रूग्ण वंचित राहू नये यासाठी आरोग्य अभियान राबवण्यात आले. तसेच एका सुदृढ व निकोप समाजाची निर्मिती व्हावी या उद्देशाने ‘मोफत आरोग्यसेवा अभियान’ राबविण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे, उपविभाग अध्यक्ष आकाश धोत्रे व विशाल पवार यांच्या वतीने पुणे शहरातील नामांकित रूग्णालयाच्या सहयोगाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
गोखलेनगर परिसरातील शहीद तुकाराम ओंबळे मैदानावर सकाळी १० ते सायंकाळी ०५ पर्यंत या आरोग्य शिबिरात विविध तपासण्या व उपचारपद्धती रुग्णांवर मोफत केल्या केल्या गेल्या. दरम्यान मनसेच्या वतीने आयोजित वैद्यकीय शिबिरात २३०० पेक्षा जास्त रुग्णांनी सहभाग घेतला त्यापैकी काही नियोजित शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले.ज्यामध्ये चार लहान मुलांवर हृदय शस्त्रक्रिया,एक हृदय शस्त्रक्रिया (ज्येष्ठ नागरिक एन्जोप्लास्टी) व एक ब्रेस्ट कॅन्सर वरील सर्व उपचार. नऊ (जयपुर फूट) कृत्रिम अवयव वाटप दोन व व्हील चेअर.एकोणीस जनरल सर्जरी.सुमारे त्रेचाळीस मोतीबिंदू शस्त्रक्रिया.२६ रुग्णांचे रूट कॅनाल. ३५० हून अधिक नागरिकांची मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली. तसेच उर्वरित नोंदणीकृत नागरिकांचे बाकीच्या तपासण्या झाल्यावर पुढील उपचार आवश्यकतेनुसार केले जातील.
पुणे शहरातील अनेक नामांकित वैद्यकीय संस्थांचे प्रमुख व डॉक्टर याप्रसंगी उपस्थित होते.ज्यामध्ये जहांगीर हॉस्पिटल,भारती हॉस्पिटल,क्लाउड नाईन हॉस्पिटल,बॉडीफाय वेल बिईंग प्रा.लि.,ज्युपिटर हॉस्पिटल लोकमान्य हॉस्पिटल,रत्ना मेमोरिअल हॉस्पिटल,माय माऊली केअर सेंटर,पिनाकल इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे,मॉर्डन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी,सिंहगड दंत महाविद्यालय व रुग्णालय,सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल, सिम्बायोसिस हॉस्पिटल,देवयानी हॉस्पिटल,सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, इत्यादी वैद्यकीय संस्था या आरोग्य मोफत सेवा अभियानात सहभागी होत्या.
यावेळी परिसरातील नागरिक व आरोग्य शिबिरात सहभागी लाभार्थी यांनी आकाश धोत्रे व विशाल पवार यांच्या सामाजिक कार्याबाबत कृतज्ञ भाव व्यक्त केले.जनसामान्यांची गरज ओळखून त्यांच्यावर असलेला वैद्यकीय उपचारांचा आर्थिक भार कमी होत रुग्णांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंदाचे हसू उमटवत येथील नागरिकांनी या सामाजिक सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.तसेच सर्वसामान्य कुटुंबातून उदयास आलेल्या आकाश धोत्रे व विशाल पवार यांच्यासारखे सजग व सर्वसमावेशक युवा नेतृत्व निर्माण होणे ही काळाची गरज आहे.असे प्रतिपादन श्रीकांत शिरोळे यांनी व्यक्त केले.
आरोग्यपूर्ण व सक्षम समाज निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आज नितांत गरज आहे.’असे प्रतिपादन डॉ.चेतन पंडित यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला पुणे शहरातील मनसेचे सर्व पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.हे आरोग्य अभियान एका दिवसापुरते मर्यादित नसून गरजू रुग्णांनी आमच्या शिवाजीनगर येथील कार्यालयामध्ये संपर्क साधावा.असे आवाहन रणजित शिरोळे यांनी केले.
या अभियानाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बालरोगतज्ज्ञ डॉ. चेतन आनंद पंडित,ज्येष्ठ नेते श्रीकांतजी शिरोळे,डॉ.मुकुंद जोशी,डॉ.सत्यजीत नाईक,डॉ.अविनाश भोंडवे,बाबु वागकर,साईनाथ बाबर,यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.