उदय सामंत यांचे जरांगे पाटलांवर भाष्य (फोटो- ani)
पुणे: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी चलो मुंबई आंदोलनाची हाक दिली असून आज ते अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या बाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले की मी जरांगे यांची भेट घेणार आहे हे आपल्याच माध्यमातून पाहिलं.
मनोज जरांगे यांचं पूर्वी आंदोलन झालं तेव्हा त्यातील अनेक मागण्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केल्या होत्या. आज मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा मोठा समारंभ आहे. गणेशोत्सव हे हिंदू धर्माच प्रतिक आहे.. कुणालाचं त्रास होणार नाहीं अशी भूमिका त्यांनी घ्यावी. ही आमची त्यांना विनंती आहे. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण एकनाथ शिंदे यांनी देऊन दाखवल आहे. हे सर्व करत असताना संयमाने घेतलं पाहिजे ही भूमिका त्यांची असावी अस यावेळी सामंत म्हणाले.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच दर्शन घेतलं.यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
याबाबत उदय सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आहेत. सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या काळात दिल गेलं आणि टिकवलं गेलं, त्यामुळं त्यांच्याबद्दल वाईट भाषेत बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही. शासनासोबत चर्चा करायची त्यांनी ठरवली तर त्यांच्या बरोबर चर्चा करायला शासन तयार आहे. संयमाने ह्या गोष्टी जरांगे यांनी हाताळल्या पाहिजेत अस यावेळी सामंत म्हणाले.
यावेळी उदय सामंत म्हणाले की आज पासून सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी मला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घ्यायला मिळालं. दर्शन घेतल्यानंतर गणपतीकडे महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुखी ठेव ही एकच मागणी केली. महाराष्ट्रासाठी जी जी सेवा आमच्याकडून करून घेता येईल ती ती करून घे अशी प्रार्थना मी यावेळी केली असल्याचं यावेळी सामंत म्हणाले.
जरांगे पाटलांच्या टिकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर
जरांगे पाटील यांनी माझ्यावर टीका केली. गबाळ उचकीन असे म्हणाले. मात्र मी त्यांना घाबरणारी नाही. माझ नाव चित्रा वाघ आहे. मी गेली 27 वर्षे राजकारणात, समाजकारणात काम करत आहे. माझ काय गबाळ उचकायच ते उचका. मी त्यांना घाबरणारी नाही. मी माझे काम करतच राहणार.