File Photo : MP Supriya Sule
पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. संतोष देशमुख हत्येप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून वेळोवेळी निशाणा साधला जात होता. त्यात धनंजय मुंडे आणि धस यांच्या भेट झाली. असे असताना आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. ‘मला कधीच वाटलं नव्हतं सुरेश धस धनंजय मुंडे यांना भेटतील. मी उद्या परळी आणि मस्साजोग येथे जाणार आहे. देशमुख आणि मुंडे कुटुंब यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी पाठीशी उभे राहणार आहोत’, असे त्या म्हणाल्या.
हेदेखील वाचा : पलंगाखाली पुरलेले दागिने चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या; लोणी काळभोर पोलीसांची मोठी कारवाई
सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना अनेक मुद्यांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, ”अजित पवार म्हणाले की, माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता. छगन भुजबळ, अशोक चव्हाण आणि आरआर पाटील यांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला होता. राज्यात अनेक जणांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला होता. मला कधीच वाटलं नव्हतं सुरेश धस-धनंजय मुंडे यांना भेटतील. बावनकुळे म्हणाले, मीटिंग चार तास झाली. आम्हाला राजकारण करायचे नाही. पारदर्शक चौकशी होऊन न्याय मिळाला पाहिजे”.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेवर 28 फेब्रुवारीला मोर्चा काढला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेत अनेक आव्हाने आहेत. अनेक डिपॉझिट काढली जात आहे, ही बाब चिंताजनक आहे. मुंबई महानगरपालिका कारभाराबाबत मोर्चा आहे. अंजली दमानिया यांच्यावर बोलताना त्या म्हणाल्या, ‘अंजली दमानिया यांनी सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिले आहेत. पारदर्शक चौकशी होऊन सरकारने नैतिकता दाखवली पाहिजे’.
सुरेश धस मॅनेज
सुरेश धस मॅनेज झाले याची शक्यता नाकारता येत नाही. बीडमध्ये कोणतंही राजकारण आणू नये. सुरेश धस यांच्याकडून मला खूप अपेक्षा होती. सुरेश धस मॅनेज आहेत का? याचं उत्तर चंद्रशेखर बावनकुळे देतील. कारण त्यांनीच चार तास मीटिंग अरेंज केली होती.
हेदेखील वाचा : Alibaug news: महिलांच्या नावे अश्लील चिठ्ठ्या लिहून घरी पाठवल्या, व्यायाम शाळेतही टाकल्या; सासवणे गावात टवाळखोरांचा हैदोस