सिंहगडावर तरुणाचा मृत्यू (फोटो- सोशल मीडिया)
पुणे: सध्या राज्यभर जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सर्वत्र सुंदर धबधबे, हिरवागार निसर्ग पाहायला मिळत आहे. सर्वत्र गारेगार आणि सुंदर असे वातावरण तयार झाल्यामुळे लोकांचा पर्यटनाकडे पाहायला मिळत आहे. दरम्यान पुण्यात देखील निसर्गाचे सुंदर असे रूप खुलले आहे. दरम्यान पुण्यातील प्रसिद्ध किल्ले सिंहगडावर देखील पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मात्र सिंहगड किल्ल्यावर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
किल्ले सिंहगडावर फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा तरुण हैद्राबादवरून फिरण्यासाठी किल्ले सिंहगडावर असल्याचे समजते आहे. या तरुणाचा सिंहगडावरील तानाजी कड्यावरून घसरून मृत्यू झाल्याचे समजते आहे.तसेच मृत्यूमुखी पडलेला तरुण मूळ सातारा जिल्ह्यातील असल्याचे देखील समजते आहे.
नेमके घडले काय?
एक तरुण आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी किल्ले सिंहगडावर आला होता. किल्ल्यावर ते तानाजी कड्यावर फिरण्यासाठी गेल्याचे समजते आहे. त्यावेळेस त्याने लघुशंकेसाठी जातो असे त्याच्या मित्रांना सांगितले. मात्र तो बराच वेळ परत न आल्याने त्याच्या मित्रांनी शोधमोहीम सुरु केली. मात्र काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत आहे. पाऊस आणि धुके यामुळे शोधकार्य करण्यात रेस्क्यू टीमला अडथळा येत आहे. मात्र लघुशंका करण्यासाठी गेलेला हा तरुण पाय घसरून कड्यावरून खाली पडला असावा, असा एक प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. काल रात्री बचावकार्य थांबवण्यात आले होते. दरम्यान आज सकाळी पहाटेपासून बचावकार्य पुन्हा सुरु करण्यात आला आहे.
पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर
पुणे मुंबई महामार्गावर घोरावडेश्वर मंदिराच्या पायथ्याजवळ करण्यात आली आहे. एका तरुणाला पिस्तुलासह पकडण्यात आले आहे. सोहम सागर शिंदे (२१, जांभुळगाव, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई प्रकाश जाधव यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहमच्या ताब्यात ७१ हजर रुपये किमतीची दोन देशी बनावटीची गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे विनापरवाना आढळून आली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.