वडगाव मावळ : शाळेत हिजाब घालण्याला (Hijab Controversy) विरोध करणाऱ्या बजरंग दल कार्यकर्त्यांची कर्नाटकमधील शिमोगा येथे हत्या करण्यात आली. या विरोधात आज बुधवारी (दि.२३) वडगाव मावळ तहसील कार्यालयासमोर मावळ तालुका बजरंग दलातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले.
वडगाव येथील पोटोबा महाराज मंदिरापासून हा मोर्चाला सुरुवात करण्यात आली काढून त्यानंतर हर्षांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यात मावळ तालुक्यातील बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटकमधील शिमोगा येथे हर्ष नामक कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. ती अतिशय निंदनीय व निषेधार्ह आहे. ही हत्या विषारी व जिहादी मानसिकतेने पछाडलेल्या नेतृत्वाकडून जे विष अल्पसंख्यांक समाजात पेरले गेले त्याचा परिणाम आहे, अशी आमची स्पष्ट धारणा आहे.
पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी जे विष पसरविण्याचे कार्य सुरु केलेले आहे. त्याचा परिणाम म्हणजे ही हत्या आहे.
भारतात घडलेल्या १९४६ च्या डायरेक्ट ॲक्शन चळवळीशी साधर्म्य असलेल्या या सर्व मानसिकतेवर कायद्याने कठोर कारवाई करावी व आरोपींना जरब बसावी, अशी शिक्षा व्हावी अशी विश्व हिंदू परिषद बजरंग दल या निवेदनाद्वारे मागणी करीत आहे.