US Hawaii Volcano: अमेरिकेत हा ज्वालामुखील झाला सक्रिय; १००० फूट उंचीवर लाव्हाचा उद्रेक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Hawaii Volcano Eruption 2026 : निसर्ग कधी आणि कोणत्या रूपाने आपले सामर्थ्य दाखवेल याचा नेम नाही. अमेरिकेतील हवाई बेटावर असलेल्या जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या ‘किलौआ’ (Kilauea Volcano) मध्ये मंगळवारी (१० मार्च २०२६) भीषण उद्रेक झाला आहे. या उद्रेकाची तीव्रता इतकी मोठी आहे की, जमिनीतून लाव्हा रसाचे लोळ तब्बल १,००० फूट उंचीपर्यंत हवेत उडत आहेत. हा थरार पाहून स्थानिक नागरिक आणि शास्त्रज्ञही थक्क झाले आहेत.
हवाईच्या बिग आयलंडवर असलेल्या या ज्वालामुखीने गेल्या काही काळापासून शास्त्रज्ञांची झोप उडवली आहे. अहवालानुसार, डिसेंबर २०२४ पासून झालेला हा ४३ वा उद्रेक आहे. मंगळवारी सकाळी अचानक ज्वालामुखीचा मुखवटा उघडला आणि त्यातून लाव्हा रसाचा प्रवाह सुरू झाला. शास्त्रज्ञांच्या मते, हा उद्रेक किती काळ टिकेल हे सांगणे कठीण आहे; कधी तो काही तासांत शांत होतो, तर कधी अनेक दिवस तांडव सुरू राहते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Prices: अमेरिकेचा ‘तेल पराक्रम’ की तांत्रिक गोंधळ? इराणच्या काळजात धडकी; US मंत्र्याच्या ‘त्या’ पोस्टने हाहाकार
ज्वालामुखी केवळ लाव्हाच बाहेर टाकत नाही, तर त्यासोबत मोठ्या प्रमाणावर राख आणि काचेसारखे तीक्ष्ण कण (Tephra) हवेत पसरत आहेत. या ‘ॲशफॉल’मुळे दृष्यमानता कमी झाली असून महामार्ग ११ सह अनेक रस्ते वाहतुकीसाठी तातडीने बंद करण्यात आले आहेत. हवाई ज्वालामुखी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला असून पर्यटकांना तिथे जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
🚨🇺🇸#BREAKING | NEWS ⚠️
Active event Volcano Kilauea in Hawaii has erupted. Shooting lava rocks, lava and ash into the atmosphere they’re asking people to stay indoors. They have had to evacuate some people. The smoking ash has blanketed the area. They have closed freeway 11… pic.twitter.com/1aY2Xy2sDu — Todd Paron🇺🇸🇬🇷🎧👽 (@tparon) March 10, 2026
credit – social media and Twitter
स्थानिक आरोग्य विभागाने नागरिकांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. ज्वालामुखीमधून बाहेर पडणारा गंधकयुक्त वायू आणि टेफ्रा कण डोळ्यांना इजा पोहोचवू शकतात. तसेच, श्वसनाद्वारे हे कण फुफ्फुसात गेल्यास गंभीर आजार होऊ शकतात. बिग आयलंडवरील अनेक नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी पावसाच्या टाक्यांवर अवलंबून आहेत, या राखेमुळे त्या टाक्यांमधील पाणी दूषित होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
Episode 43 of the Kilauea volcano eruption has begun in Hawaii The lava flows look exactly like wings of fire pic.twitter.com/pKdsSiF74B — Surajit (@Surajit_) March 11, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Production Top 10 Countries : जगात कोण आहे ‘ब्लॅक गोल्ड’चा किंग? ‘हे’ आहेत जगाला तेल पाजणारे टॉप 10 देश
हवाईचे स्थानिक अधिकारी आणि राष्ट्रीय हवामान सेवा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सुदैवाने, लाव्हाचा प्रवाह सध्या मानवी वस्तीपासून दूर असणाऱ्या विवरापुरता (Crater) मर्यादित आहे, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. ज्वालामुखीच्या हालचाली सतत बदलत असल्याने ‘हाय अलर्ट’ कायम ठेवण्यात आला आहे.
Ans: या ज्वालामुखीचे नाव 'किलौआ' (Kilauea) असून तो जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक मानला जातो.
Ans: यामुळे डोळ्यांची जळजळ, त्वचेचे विकार आणि गंभीर श्वसनविकार (Asthma/Bronchitis) होऊ शकतात.
Ans: ज्वालामुखीची राख आणि धुरामुळे ररस्त्यावर काहीही दिसत नसल्याने (Zero Visibility) अपघाताचा धोका टाळण्यासाठी हायवे बंद केला आहे.






