पुणे अपघात(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : IND vs SA Test series : ‘तो नेहमीच दयाळू राहिला…’ दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंतने कुणाचे मानले आभार?
याप्रकरणी पुण्यातील सिंहगड रोड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. माहितीनुसार, एक माल वाहतूक कंटेनर सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास साताऱ्याकडून पुण्याकडे येत होता. कंटेनर मालाने भरलेला होता. हा कंटेनर वेगात होता. अचानक नवले ब्रिज आणि नर्हे ब्रिजच्या मधील भागात सेल्फी पॉंईटजवळ अचानक भरधाव कंटेनरने समोर चालणाऱ्या वाहनांना उडविले. एका वाहनानंतर कंटेनरे सलग १५ ते १८ वाहनांना उडवत उडवत पुढे आला. नंतर त्याने एका चारचाकी कारला धडक दिली. या चारचाकीला फरफटत नेहून समोर असलेल्या दुसऱ्या कंटेनरला धडक दिली. त्यामुळे दोन्ही कंटेनरच्यामध्ये कार दबली गेली आणि तिचा चेंदामेंदा झाला. त्यात कारमध्ये ५ ते ६ लोक होते.
हेही वाचा : IND vs SA Test series : ‘तो नेहमीच दयाळू राहिला…’ दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंतने कुणाचे मानले आभार?
कार दोन्ही कंटेनरच्यामध्ये अडकल्यानंतर कारने पेट घेतला. पेट घेताच आगीचा भडका उडाला आणि अपघातानंतर अग्नितांडव सुरू झाले. कारसोबतच दोन्ही कंटेनरने पेट घेतला. यात कारमधील व्यक्ती आणि धडक देणाऱ्या कंटेनरमधील दोन व्यक्ती या आगीत होरपळल्या गेल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. येथील नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग इतकी मोठी होती की, आगीचे लोळ मोठे असल्याने नागरिकांना जवळही जाता येत नव्हते. दरम्यान, घटनेनंतर वाहतूक पोलिस व स्थानिक पोलिस, अग्निशमन दलाने याठिकाणी धाव घेतली.






