वेल्हे तालुका आता राजगड नावाने ओळखला जाणार (फोटो- सोशल मिडीया)
पुणे: महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या नामांतरावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य सरकारने वेल्हे तालुक्याचे नाव आता राजगड असे केले आहे. या नावाला केंद्र सरकारची मंजूरी मिळाली आहे. वेल्हे तालुक्याला राजगड नाव देण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड किल्ला या वेल्हे तालुक्यात येतो. याच किल्ल्याचे नाव आता या वेल्हे तालुक्याला देण्यात आले आहे.
महराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखरबावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. वेल्हे तालुक्याचे नामंतर करण्यात आले असून आता या तालुक्याला राजगड असे नाव देण्यात आलेले आहे. लवकरच राज्य सरकारचे राजपत्र जारी केले जाणार आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत.
स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव तालुक्याला देण्याची मागणी गेले अनेक वर्षांपासून केली जात होती. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. दरम्यान गेले अनेक वर्षे सुरू असलेली मागणी आता मान्य झाली आहे. वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यासाठी 70 पैकी 58 ग्रामपंचायतींनी सकारात्मक भूमिका मांडली होती.