आमदार आशुतोष काळे यांची मोठी घोषणा
कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन व ६४ पोलिस कर्मचारी वसाहत इमारतीचे तसेच फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांच्या हस्ते आणि आमदार Ashutosh Kale यांच्या उपस्थितीत मंगळवारी उत्साहात पार पडले. या वेळी आमदार काळे बोलत होते.
आमदार काळे म्हणाले की, कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनची इमारत ही केवळ विटा आणि सिमेंटची रचना नसून ती नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी आहे. स्वर्गीय Ajit Pawar कोपरगाव दौऱ्यावर आले असताना पोलिस स्टेशन व कर्मचारी वसाहतीची अत्यंत खराब स्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यानंतर मंत्रालयात बैठक घेऊन त्यांनी तातडीने पोलिस स्टेशन व कर्मचारी वसाहतीसाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. या पाठपुराव्यामुळे कोपरगाव शहराच्या विकासात नव्या पोलिस स्टेशन आणि कर्मचारी वसाहत इमारतीमुळे मोठी भर पडली आहे.
Ahilyanagar News: आता लक्ष सभापतीपदाच्या निवडीकडे! स्थायी समितीवर कोणाला संधी मिळणार?
पूर्वी कोपरगाव शहर व तालुका यांच्यासाठी एकच पोलिस स्टेशन होते. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येत होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी २०१३ मध्ये तत्कालीन गृहमंत्री Ram Shinde यांच्या माध्यमातून शहर व ग्रामीण अशी दोन स्वतंत्र पोलिस ठाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यात आर्थिक फसवणूक आणि अमली पदार्थांच्या रॅकेटसारख्या गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने अधिक दक्षतेने काम करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
तसेच तालुक्यातील अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अधिक कडक कारवाई करावी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहनही करण्यात आले. महायुती सरकारच्या वतीने राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोपरगाव तालुक्यातील प्रशासकीय कामकाज सुरळीत राहण्यासाठी कोपरगाव कोर्ट, उपजिल्हा रुग्णालय तसेच पोलिस स्टेशन व कर्मचारी वसाहत उभारण्यात राज्य सरकारचे सहकार्य लाभल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी नमूद केले. यासाठी मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेही सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.






