मोठी बातमी! पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
संपूर्ण राज्याला आणि देशाला हादरवून टाकणाऱ्या पूजा खेडकर प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. आयएएस परीक्षेत गैरप्रकार केल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. आयएएस परीक्षेत अपंगत्व आणि ओबीसी आरक्षणाचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
Liquor Scam : दारू घोटाळाप्रकरणी IAS विनय चौबे यांना अटक; ACB ची कारवाई
तिने असा कोणता गंभीर गुन्हा केला आहे? ती ड्रग्ज माफिया किंवा दहशतवादी नाही. खून (३०२) केलेला नाही. ती एनडीपीएस गुन्हेगार नाही. तुमच्याकडे एक सिस्टम किंवा सॉफ्टवेअर असायला हवं. तुम्ही चौकशी पूर्ण करा. तिने सर्वस्व गमावलं आहे आणि तिला कुठेही नोकरी मिळणार नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.
पूजा खेडकरने आयोग आणि जनतेची फसवणूक केली आहे, असं कारण देत दिल्ली पोलिस आणि यूपीएससीने तिच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला होता. दिल्ली उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून लावली होती. अंतरिम संरक्षण काढून घेतले होते. यूपीएससीने उमेदवारी रद्द करून पूजा खेडकरला भविष्यातील कोणत्याही परीक्षा देण्यास मनाई केली होती. केंद्र सरकारने आयएएस (प्रोबेशन) नियमांच्या नियम १२ चा हवाला देऊन तिला भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्त केलं आहे.
पुण्यातील वादग्रस्त पोस्टिंगनंतर खेडकर कायद्याच्या कचाट्यात सापडली, परंतु नंतर महाराष्ट्र सरकारने सत्तेच्या गैरवापराच्या आरोपांमुळे ही पोस्टिंग वाशिममध्ये केली. त्यानंतर राज्याच्या ओबीसी कल्याण मंत्र्यांनी ओबीसी नॉन-क्रीमी लेयरशी संबंधित असल्याच्या तिच्या दाव्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या प्रकरणाला प्रकरणाला गंभीर वळण लागलं.
नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (यूपीएससी) खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. मानसिक आजार, कमी दृष्टी आणि हालचालींच्या समस्यांसह विविध अपंगत्व दर्शविणारी अनेक प्रमाणपत्रे वापरल्याचा अहवालात म्हटलं आहे. तसंच खेडकरने अर्ज प्रक्रियेदरम्यान वेगवेगळ्या नावांचा वापर केला. पूजा दिलीपराव खेडकर आणि पूजा मनोरमा दिलीप खेडकर अशा नावं वापरली होती, ही चिंतेची बाब आहे, ज्यामुळे तिने किती प्रयत्न केले याबद्दल शंका आहे. जास्तीत जास्त परीक्षा देण्यासाठी नाव बदलल्याचाही तिच्यावर आरोप आहे.
Waqf Bill Hearing : ‘ठोस पुरावे असतील तरच न्यायालय…’, वक्फ कायद्यावर CJI यांची महत्त्वाची टिप्पणी
आयएएस म्हणून निवड होण्पूयार्वी पूजा भारतीय महसूल सेवा अधिकारी म्हणून काम करत होती आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणात तिची नियुक्ती झाली होती. पूजा खेडकरने पूर्वी तिच्या आयआरएस पदासाठी ओबीसी आणि पीडब्ल्यूबीडी (कमी दृष्टी) श्रेणी वापरल्या होत्या, परंतु नंतर आयएएससाठी पात्र होण्यासाठी पीडब्ल्यूबीडी (मल्टीपल डिसॅबिलिटीज) आणि नवीन ओबीसी प्रमाणपत्र वापरलं होतं, असा आरोप तिच्यावर आहे.