• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Sharad Pawars Ncp Has Lost Strength In Ambegaon And Shirur Constituencies

आंबेगाव -शिरूरमध्ये तुतारीचा आवाज विरला! वळसे पाटलांना फक्त शिवसेनेचे आव्हान?

शरदचंद्र पवार गटाची आंबेगाव - शिरूर मतदार संघात सध्या होत असलेली वाताहात आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाने निर्माण केलेले आव्हान पाहता या मतदारसंघाचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 23, 2026 | 01:36 PM
आंबेगाव -शिरूरमध्ये तुतारीचा आवाज विरला! वळसे पाटलांना फक्त शिवसेनेचे आव्हान?

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • तुतारीचा आवाज विरला!
  • वळसे पाटलांना फक्त शिवसेनेचे आव्हान?
  • आंबेगाव -शिरूरमध्ये नेमकं काय घडतंय?
रांजणी/ रमेश जाधव : सन 2024 सालच्या आंबेगांव – शिरूर विधानसभा निवडणुकीत ज्या देवदत्त निकम यांनी दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील यांना कडवे आव्हान देऊन राज्याच्या राजकीय चर्चेत स्थान मिळवले होते. आज केवळ दीड वर्षात त्या चर्चेचा फुगा पूर्णपणे फुटला आहे. शरदचंद्र पवार गटाची आंबेगाव – शिरूर मतदार संघात सध्या होत असलेली वाताहात आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाने निर्माण केलेले आव्हान पाहता या मतदारसंघाचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. प्रस्थापितांना रोखण्यासाठीची राजकिय ताकद आता निकम यांच्यात नसून, ती शिवसेना एकनाथ शिंदे गटात निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष देवदत्त निकम यांना जेष्ठ नेते शरद पवार यांनी जिल्हाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली खरी, परंतु निकम यांना स्वतःचा आंबेगाव -शिरूरचा राजकिय गड सांभाळता आला नाही. ज्या मतदारसंघात निकम यांनी दीड वर्षांपूर्वी मोठी राजकिय आघाडी घेतली होती तिथे आज पक्षाला उमेदवार शोधण्यासाठी वणवण करावी लागत आहे. निकम यांच्या घमेंडी आणि मतलबी स्वभावाचा फटका कार्यकर्त्यांना बसल्याने ज्येष्ठ नेते बाळासाहेब बाणखेले, दामू अण्णा घोडे, तालुका महिला अध्यक्षा पूजा वळसे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर आणि दादाभाऊ थोरात यांच्यासारख्या तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी निकम यांना अखेरचा जय महाराष्ट्र केल्याचे सांगितले जात आहे.

आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तिकीट वाटपात तर शरदचंद्र पवार पक्षाचे पार दिवाळे निघाले आहे. आदिवासी पश्चिम भागातील शिनोली गटात ही जागा मित्र पक्षांना द्यावी लागली. घोडेगाव – पेठ गटामध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या श्रेष्ठींना उमेदवारच मिळाले नाहीत तर अवसरी – पिंपळगाव आणि कळंब – चांडोली बु. या स्वतःच्या निकमांच्या बालेकिल्ल्यात त्यांना बाहेरून उमेदवार आयात करावे लागले. ज्या शिरूर तालुक्याने निकम यांना विधानसभा निवडणुकीत तारले होते तिथे आज कोणी पक्षाचा एबी फॉर्म देखील घ्यायला तयार नाही. पाबळ आणि रांजणगाव गटात तर तुतारी पूर्णपणे गायब झाली आहे. ज्यांच्या जीवावर डॉ. अमोल कोल्हे आणि निकम यांना आघाडी मिळाली ते निष्ठावंत कार्यकर्ते आता देवदत्त निकम यांच्यापासून दूर गेल्याचे दिसून येते.

दरम्यान एकीकडे आंबेगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गटाचा अस्त होत असताना शिवसेना एकनाथ शिंदे गटाने संपूर्ण मतदारसंघात चैतन्य निर्माण केले आहे. मंचर नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने मारलेली मुसंडी ही पक्षाच्या वाढत्या ताकदीची नांदी होती. आज शिवसेनेने अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य पदाच्या जागेवर सक्षम उमेदवार उभे करून आपली संघटनात्मक राजकिय ताकद सिद्ध केली आहे. माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते देखील निस्वार्थ कार्यावर विश्वास ठेवून शिवसेनेचे काम करत आहेत.

एकूणच आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदार संघाचे सध्याचे चित्र पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तीन- तेरा वाजले आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यावर तालुक्यातील बहुतांशी महत्त्वाचे कार्यकर्ते नाराज असल्याचे देखील दिसून येते तर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी निकम यांना सोडून इतर पक्षाचा आश्रय घेतला असल्याचे प्रकर्षाने जाणवते. एकेकाळी वळसे पाटलांना तालुक्यात आव्हान देणारा नेता म्हणून देवदत्त निकम यांच्याकडे पाहिल जात होते. परंतु सध्याची तालुक्यातील राजकिय परिस्थिती पहाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार गट ) आणि या पक्षाचे नेतृत्व करणारे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम हे पूर्णतः बॅक फुटवर गेल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा : लोणी काळभोर गटात राजकीय रणधुमाळी; उमेदवारी अर्जानंतर निवडणूक पूर्णपणे रंगात

Web Title: Sharad pawars ncp has lost strength in ambegaon and shirur constituencies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Dilip Walse
  • Election News
  • MP Sharad pawar

संबंधित बातम्या

केंद्रात अन् राज्यात ‘हिरो’, बारामतीत मात्र ‘झिरो’; स्थानिक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
1

केंद्रात अन् राज्यात ‘हिरो’, बारामतीत मात्र ‘झिरो’; स्थानिक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Revati Sule wedding : सुप्रिया सुळेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे; रेवती सुळे होणार नागपूरच्या सुनबाई
2

Revati Sule wedding : सुप्रिया सुळेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे; रेवती सुळे होणार नागपूरच्या सुनबाई

जनतेने काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला; ZP अन् पंचायत समितींच्या निकालावर सपकाळांची प्रतिक्रीया
3

जनतेने काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला; ZP अन् पंचायत समितींच्या निकालावर सपकाळांची प्रतिक्रीया

नाणेकरवाडी–म्हाळुंगे गटात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम; जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत संमिश्र निकाल
4

नाणेकरवाडी–म्हाळुंगे गटात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम; जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत संमिश्र निकाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Zp : पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार ‘हा’ बंगला

Pune Zp : पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार ‘हा’ बंगला

Feb 12, 2026 | 06:42 PM
आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, सिनेमातील खास गोष्टी बद्दल अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, सिनेमातील खास गोष्टी बद्दल अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

Feb 12, 2026 | 06:40 PM
MG Majestor साठी Pre Booking सुरु! किती रुपयात बुक करता येईल एसयूव्ही? केव्हा मिळणार डिलिव्हरी? जाणून घ्या

MG Majestor साठी Pre Booking सुरु! किती रुपयात बुक करता येईल एसयूव्ही? केव्हा मिळणार डिलिव्हरी? जाणून घ्या

Feb 12, 2026 | 06:40 PM
Bigg Boss Marathi Season 6: “बोलायला फाटते तुझी…” शेवटी One By One आलेच! राकेशने विशालला दिले खुले चॅलेंज

Bigg Boss Marathi Season 6: “बोलायला फाटते तुझी…” शेवटी One By One आलेच! राकेशने विशालला दिले खुले चॅलेंज

Feb 12, 2026 | 06:39 PM
नवी मुंबईत Patel Engineering चा ऐतिहासिक पराक्रम! सिडकोच्या Water Tunnel प्रकल्पात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित

नवी मुंबईत Patel Engineering चा ऐतिहासिक पराक्रम! सिडकोच्या Water Tunnel प्रकल्पात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित

Feb 12, 2026 | 06:37 PM
IND vs NAM, T20 World Cup Live : अरुण जेटली स्टेडियमवर भारत 300 धावा करणार? नामिबियाचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

IND vs NAM, T20 World Cup Live : अरुण जेटली स्टेडियमवर भारत 300 धावा करणार? नामिबियाचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

Feb 12, 2026 | 06:36 PM
मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा

मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा

Feb 12, 2026 | 06:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.