श्री तुळशीबाग गणपती पुणे
पुणे: रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास… चंदन उटीचे लेपन आणि तब्बल १ हजार ५०० कलिंगडांचा नैवेद्य श्री तुळशीबाग महागणपतीला दाखविण्यात आला. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात (१२५) संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पासमोर साकारलेला कलिंगडांचा नैवेद्य व पुष आरास पाहण्याकरिता गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या वतीने कलिंगडाचा महानैवेद्य व वासंतीक चंदन उटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम, दत्ताभाऊ कावरे, गणेश रामलिंग आणि परिसरातील व्यापारी उपस्थित होते. प्रसिद्ध पुष्प सजावटकार सुभाष सरपाले यांनी ही आरास साकारली.
संकष्टी चतुर्थी च्या दिवशी वासंतिक चंदन उटी लेपन करण्यात आले. तसेच रात्री गणेश जागर आणि महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळातर्फे विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्यावेळी गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला. तसेच मंदिरामध्ये गणेशयाग देखील आला.
पुणे शहरात देखील भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची देखील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पुण्यातील शिवाजी रस्त्यावर आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.
Pune News: भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
दरम्यान भारत पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाल्याने देशातील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याच दृष्टीने पुणे पोलिसांनी देखील खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. दगडूशेठ हलवाई गणती मंदिराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. इथे येणारया प्रत्येकावर लक्ष ठेवले जात आहे.
पुणे शहरात देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर दंगल विरोधी पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच संवेदनशील भागात नाकाबंदी केली जात आहे. पुण्यातील अनेक भागात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.