३१९ प्रवाशांकडून दंड वसूल (फोटो- सोशल मीडिया )
पुणे: २०२४-२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करत एकूण ३ लाख ४० हजार रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे. पुणे विभागाच्या अंतर्गत असलेल्या १४ आगारांमधून एसटीने केलेल्या तपासणी मोहिमेत ३१९ फुकट्या प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कशा प्रकारची कारवाई होते?
विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मूळ तिकिटाच्या रकमेबरोबर त्याच्या दुप्पट दंडाची रक्कम वसूल केली जाते. त्यावर १८ टक्के जीएसटीही लागू होतो. शिवाय प्रवाशांकडे जर इतर सामान असल्यास, त्याचे शुल्कही स्वतंत्रपणे वसूल करण्यात येते.
२०२४ –२५ मध्ये परिवहन विभागीय कार्यालय पुणे यांच्याकडून करण्यात आलेली दंडात्मक कारवाई
भाडे वसूली ४६,५५० रुपये,
दंड ८३,१८७ रुपये
इतर वसूली २,१०,४९७ रुपये
एकूण ३,४०,२३४ रुपये
एसटीने प्रवास करण्यासाठी सर्वसामान्यांना परवडणारे दर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रवाशांनी विना तिकिट प्रवास करू नये,एसटी विभागाला सहकार्य करावे.
– अरुण सिया,
विभाग नियंञक,पुणे एसटी विभाग
विना तिकिट प्रवास कोणत्याही प्रवाशांनी करू नये, विना तिकिट प्रवास करणाऱ्यांची कडक तपासणी चालू आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांनी एसटी विभागाला सहकार्य करावे.
– कमलेश धनराळे,
विभागीय वाहतुक अधिकरी, पुणे
लालपरीच्या अडचणीत वाढ! परिवहन विभागाची श्वेतपत्रिका जाहीर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बिघडत्या आर्थिक स्थिती लक्षात घेत राज्य सरकार आता त्यात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सोमवारी (२३ जून) एक सविस्तर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करणार आहेत, ज्यामध्ये महामंडळाची सध्याची आर्थिक स्थिती, तोटा, महसूल, खर्च, थकीत कर्जे आणि प्रलंबित देयके यांची संपूर्ण माहिती देण्यात आली. या श्वेतपत्रिकातून केवळ परिस्थिती सार्वजनिक होणार नाही तर महामंडळाला संकटातून बाहेर काढण्यासाठी संभाव्य उपाय देखील सुचवले जाणार आहेत.
एसटी महामंडळाला सध्या दररोज १ ते २ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. आतापर्यंत तर एकूण तोटा १०,००० कोटींपेक्षा जास्त झाला आहे. मार्च २०२४ मध्ये भाड्यात सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी, परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. गेल्या ९ वर्षांत एसटी महामंडळाने ऑगस्ट २०२३ वगळता कोणत्याही महिन्यात नफा कमावलेला नाही. त्या एका महिन्यात ₹ १६.०८ कोटींचा नफा नोंदवला गेला. महामंडळावर सध्या कर्मचाऱ्यांचे ₹३,५०० कोटी आणि पायाभूत सुविधा आणि पुरवठा देणी म्हणून ₹७,००० कोटी देणे आहे.