बुरखा घातल्याने दहावी परीक्षेस प्रवेशास नकार (फोटो 0- istockphoto)
Maharashtra SSC Exam 2025: आजपासून दहावीची परीक्षा, ‘या’ केंद्रांवरील शिक्षक अन् इतर कर्मचारी बदलले
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुविधा
परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हानिहाय प्रत्येकी दोन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्यमंडळ व ९ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करुन हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याच्या सूचना
परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहे. तसेच त्यांनी परिरक्षण केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरीत करेपर्यंत मोबाईलमध्ये चित्रीकरण्याची सूचना दिल्या आहेत.