पुण्यात तापमानात चढ-उतार कायम
शहराच्या तापमानात लक्षणीय वाढ
थंडी ओसरून उकडा वाढल्याचा अंदाज
किमान व कमाल तापमान स्थिर राहण्याचा अंदाज
पुणे: शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान व कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदविली जात असून थंडी ओसरून उकाड्यात वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांतही पुण्याच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
शुक्रवारी (ता.२३) शहर आणि परिसरात संमिश्र वातावरण अनुभवास आले. पहाटे व रात्री गारवा जाणवला, तर दुपारी कडक उन्हामुळे उष्णतेची तीव्रता वाढली. सायंकाळी अंशतः ढगाळ वातावरण राहिले. या दिवशी किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारी (ता.२४) किमान व कमाल तापमान स्थिर राहण्याची शक्यता असून किमान तापमान १५ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, तर सकाळी विरळ धुक्याची शक्यता आहे.
कभी थंडी तो कभी…; Pune शहरात तापमानाची स्वतःशीच स्पर्धा; चढ-उतार कायम
दरम्यान, सोमवारपासून (ता. २६) तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. या काळात आकाश मुख्यतः निरभ्र राहील, तर सायंकाळी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.
Pune शहरात तापमानाची स्वतःशीच स्पर्धा
पहाटेच्या सुमारास काही ठिकाणी विरळ धुके दिसून आले, मात्र दिवसभर आकाश निरभ्र राहिले. सकाळी वातावरण आल्हाददायक असले तरी दुपारनंतर वाढलेल्या उन्हामुळे नागरिकांची गैरसोय झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी (दि. २२) किमान व कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असून किमान तापमान सुमारे १४ अंश, तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांत आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून सकाळच्या वेळी विरळ धुक्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Pune Weather: हा खेळ हवामानाचा ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस गारठा…; कसे असणार वातावरण?
आकाश मुख्यतः निरभ्र राहील, तर सकाळच्या वेळेत विरळ धुके पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहणार असून कमाल तापमानात एक अंशांची घट होऊन ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, तर सकाळच्या वेळेत विरळ धुके पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.






