Rada At Sassoon Hospital In Pune The Mla Hit Both Of Them In The Ear Nrdm
वादग्रस्त आमदारांचा पुन्हा राडा; पोलीस कर्मचाऱ्यांसह दोघांच्या कानशिलात मारली
पुण्यात सातत्याने वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेले वादग्रस्त आमदार सुनिल कांबळे यांचा पुन्हा एकदा राडा झाला असून, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या एका कार्यक्रमातच एनसीपीच्या पदाधिकाऱ्यासह शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या कानशिलात मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पुणे : पुण्यात सातत्याने वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेले वादग्रस्त आमदार सुनिल कांबळे यांचा पुन्हा एकदा राडा झाला असून, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या एका कार्यक्रमातच एनसीपीच्या पदाधिकाऱ्यासह शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या कानशिलात मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या घटनेने शहराच प्रचंड खळबळ उडाली आहे. या मारहाणीमुळे पुणे पोलीस दलात प्रचंड नाराजी पसरली असून, आता आमदारांवर गुन्हा दाखल होणार का असाही प्रश्न विचारला जात आहे. यापुर्वीही आमदार सुनिल कांबळे यांनी कोव्हीडच्या काळात त्यांची कार आडविल्यानंतर खडकमधील पोलिसांना आरेरावी घालत चांगलाच गोंधळ घातला होता. त्यामुळे राज्यकर्तेच जर अडथळे अन् नियमबाह्य वागत असतील कसं असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयात ही घटना घडली असून, रुग्णालयातील तृतीय पंथीयांच्या वार्ड उद्घाटन कार्यक्रम नुकताच पार पडला. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी अनेक मान्यवर तसेच पदाधिकारी आणि ससूनचे डॉक्टर उपस्थित होते.
शुक्रवारी हा कार्यक्रम दुपारी १२ च्या सुमारास सुरू झाला. परंतु, उद्घाटन कार्यक्रमातील पाटीवर नाव नसल्याने आमदार सुनील कांबळे संतप्त झाले, त्यांना राग अनावर आला. याबाबत त्यांनी विचारणा केली. तेव्हा त्यांनी जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावल्याचं समजते.
दरम्यान, याबाबत जितेंद्र सातव यांना विचारण्यात आले, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. याबाबत वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देईल, असे ते म्हणाले. यासोबतच कार्यक्रमात आणखी एकाला कानशिलात मारल्याचे रेकॉर्ड झालं आहे. याबाबत माहिती घेतल्यानंतर कांबळे हे स्टेजच्या पायऱ्यांवरून खाली उतरत असताना पोलीस कर्मचारी त्याठिकाणी उभा होता. त्यालाही कांबळे यांनी कानशिलात मारली. स्थानिक आमदार असूनही उद्घाटनासाठी नाव नसल्यानं ते संतप्त झाले होते. ही दुसरी घटना असून, पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावली.
नेमका काय प्रकार घडला आहे ?
पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला भाजपच्या आदाराने कानशीलात लगावली. ससून रुग्णालयातील तृतीय पंथीयांच्या वार्डचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. या कार्यक्रमाची पत्रिका अथवा बोर्डावर स्थानिक आमदार सुनील कांबळे यांचं नाव नव्हतं. त्यामुळे सुनील कांबळे संतप्त झाले. त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी असणाऱ्या जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावली. जितेंद्र सातव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैदकीय केंद्राचे प्रमुख आहेत. त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्येच सुनील कांबळे यांनी जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावल्याचं समोर समोर आले.
गुन्हा दाखल होणार का?
आमदार सुनिल कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या विनाकारणच कानशिलात मारहाण केल्याचे दिसत आहे. संबंधित कर्मचारी हा बंडगार्डन पोलीस ठाण्यातील तपास पथकात नेमणूकीस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रम असल्याने त्याला बंदोबस्तासाठी त्या ठिकाणी पाठविण्यात आले होते. तो शासकीय काम करत होता. त्याची काहीच चूक नसताना देखील त्याला मारहाण झाली. त्यामुळे आता या प्रकरणात गुन्हा दाखल होणार का, अशी चर्चा पोलीस दलातच सुरू आहे. तर, वरिष्ठ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु, या प्रकरणाने प्रचंड नाराजी पसरली आहे.
Web Title: Rada at sassoon hospital in pune the mla hit both of them in the ear nrdm