कर्जत/ संतोष पेरणे : नेरळ गावात राहणाऱ्या आणि राज्य सरकारच्या शिक्षण विभागात अधिकारी पदावर निवृत्त झालेल्या रंजना प्रभाकर चासकर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी नर्मदा परिक्रमा केली.तब्बल चार महिने नर्मदा परिक्रमा करताना चालत चार हजार किलोमीटर प्रवास केला.रंजना चासकर यांच्या जिद्दीचे कौतुक होत असून नर्मदा परिक्रमा करण्यासाठी पैशाची गरज नसते फक्त श्रद्धा हवी असे मत त्यांनी मांडले आहे.
मूळच्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील रहिवाशी असलेल्या रंजना प्रभाकर चासकर या नेरळ येथील नेरळ विद्या मंदिर शाळेत शिक्षिका होत्या.पुढे पनवेल पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी तसेच मुंबई शिक्षण मंडळाच्या सदस्या राहिलेल्या रंजना चासकर या वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त झाल्या आहेत.शासकीय सेवेत असताना आणि निवृत्त झाल्यावर मागील पाच वर्षे एकदाही सकाळचा मॉर्निंग वॉक साठी घराच्या बाहेर न पडणाऱ्या रंजना चासकर यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली यावर सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसला नाही.एक डिसेंबर रोजी नेरळ येथून मध्य प्रदेश मधील ओंकारेश्वर येथे पोहचल्या आणि तेथे नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचा संकल्प गुरुजींचे हाती स्वीकारून रंजना चासकर नेरळ गावातील अन्य एका जेष्ठ महिला सहकारी यांच्यासह दोन डिसेंबर २०२४ रोजी ओंकारेश्वर येथून नर्मदा परिक्रमेला निघाल्या.
आपल्या नर्मदा परिक्रमेची सुरुवात उत्तर तटावरून सुरू करताना महेश्वर पासून प्रवास सुरू केला.नेरळ मध्ये एकदाही सलग दोन तीन किलोमीटर चालण्याची सवय नसलेल्या रंजना चासकर यांनी पहिल्या दिवशी पाठीवरील ओझे यासह १४ किलोमिटर अंतर पार केले.नंतर सवय झाली आणि त्यापुढे दररोज ३० किलोमिटर प्रवास त्यांच्याकडून होऊ लागला.नर्मदा नदीच्या उगम स्थान असलेल्या नेभावर या ठिकाणी पोहचल्यावर अर्धी परिक्रमा पूर्ण होते.त्यावेळी नेरळ मधील दोघींना आणखी दोन महिला यांची सोबत मिळाली.या पायी प्रवासात रंजना चासकर यांनी तब्बल चार महिने पायी प्रवास करीत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली.ओंकारेश्वर येथे पुन्हा परत येत यात्रा यशस्वी रित्या पूर्ण केल्यावर तेथून नेरळ असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
नर्मदाखंड म्हणजे काय…
अनेक ऋषींची तपश्चर्य झालेले आहे,परिक्रमा करणारे म्हणजे मांडवी वृक्ष परिक्रमा तेरा वर्षांची होती.परिक्रमा मध्ये रस्त्यात अगदी दारूडा माणूस सुद्धा येऊन देखील पाया पडतो.रस्त्यात कोणीही खायला देत असते आणि ते प्रसाद म्हणून खायचे असते.अनेक किलोमिटर चां जंगल प्रवास असतो पण त्यावेळी देखील सुरक्षित वाटते.
प्रवास..
ओंकारेश्वर पासून मंडलेश्वर येथून नेमावर म्हणजे नर्मदेचे नाभीस्थान आहे नेमावर पर्यंत पोहोचलो की रेवासागर गेल्यावर अर्धी परिक्रमा होते. त्यानंतर आपण पुन्हा उतरत्यावरून तसेच पुढे गेलो की पुढे अमरकंटक आहे आणि अमरकंटक येथे एक भाग यात्रा पूर्ण होते. पुन्हा अमरकंटकून आपण दक्षिण तटावर येथून ओमकारेश्वर प्रवास सुरू होतो. ओमकारेश्वर आला पाणी जल वाहण्यासाठी पुन्हा ओंकारेश्वरला आल्यानंतरच ती परिक्रमा पूर्ण झाली असे म्हणतात.मध्य प्रदेशातच म्हणजे मध्य प्रदेश चा भाग जास्त येतो परिक्रमेत गुजरातचा थोडा कमी म्हणजे गुजरातचा साधारण एक महिना वगैरे असा येतो पण सर्व दूर म्हणजे संपूर्ण नर्मदा खंडात खूप सेवा केली जाते.तर आपल्या घरी नेरळ येते आल्यावर त्यांनी कन्या पूजन आणि गंगा पूजन करून नर्मदा परिक्रमा शेवट केला.