कर्जत/ संतोष पेरणे : घरगुती खानावळ असो किंवा पंचतारांकीत हॉटेल सुरु करण्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे अन्न औषध प्रशासनाचा परवाना असणं. चौक राज्यमार्ग रस्त्यावर ‘दि प्लेट’ नावाचे तारांकीत सुविधा देणारे हॉटेल आहे.तारांकित सुविधेच्या नावावर हे हॉटेल गेली दोन वर्षे राज्यमार्ग रस्त्याच्या अगदी जवळ सुरु असून देखील अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या तारांकित सुविधा देणाऱ्या हॉटेल वर अन्न औषध प्रशासनाचा वरदहस्त असून या हॉटेलकडे हॉटेल व्यवसाय करण्याचे कोणतेही परवाने नाहीत. दरम्यान या हॉटेलवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी करणार इमेल तक्ररदार सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड यांनी पाठविला आहे.
कर्जत चौक राज्यमार्ग रस्त्यावर ‘दि प्लेट’ नावाचे हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आपल्या मित्रासह कर्जत तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड हे नाष्टा करण्यासाठी गेले होते. नाष्टा केल्यानांतर विजय गायकवाड यांना त्या बिलावर युटिलिटी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्य़ा नावाने दि प्लेट हॉटेल कडून दिलेल्या बिलावर फूड लायसन्स छापण्यात आलेले नाही. त्याबद्दल विजय गायकवाड यांनी हॉटेल मधील वेटरकडे अन्न औषध प्रशासनाने दिलेल्या लायसन्सची मागणी केली. त्यावेळी हॉटेलचे मॅनेजर रजेवर असल्याने त्यांच्याकडून मागवून घेतो असे उत्तर वेटरने दिले. त्यानंतर साधारण तासभर तेथे बसून रोहिल्यांनंतर हॉटेलचे वेटर हे विजय गायकवाड यांच्याकडे आले आणि आमच्या मॅनेजर कडून आलेला निरोप सांगितला. आमच्या हॉटेल ने हे लायसन्स मिळविण्यासाठी प्रक्रिया सुरु केली असल्याची माहिती दिली.मात्र सदर हॉटेल दोन वर्षे सुरु असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे फूड लायन्सस नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले.
कर्जत चौक या राजयमार्ग रस्त्यापासून काही मीटर अंतरावर हे हॉटेल सुरु आहे. त्यामुळे विजय गायकवाड यांनी हॉटेल व्यवस्थपन यांच्याकडे एमएसआरडीसीचे ना हरकत दाखला दाखवण्याची मागणी केली. मात्र सदर दाखला देखील डी हॉटेल व्यवस्थापन यांच्याकडे नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या हॉटेलवर राज्य रस्ते विकास महामंडळ आणि अन्न औषध प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांचे वरदहस्त आहे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड यांनी अन्न औषध प्रशासनाचे जिल्हा अन्न सुरक्षा अधिकारी निकम यांच्याशी संपर्क साधला असता दि प्लेट नावाचे हॉटेल कुठे आहे याची आम्हाला माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली.त्यानंतर विजय गायकवाड यांनी अन्न औषध प्रशासन उप आयुक्त महांगडे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही जिल्ह्यात दोनच अधिकारी असून त्या त्या हॉटेलची चौकशी करण्यासाठी तुम्ही आमच्याकडे तक्रार अर्ज पाठवावा अशी सूचना केली.
दरम्यान,विजय गायकवाड यांनी आजच तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि अन्न औषध प्रशासन यांना इमेल द्वारे केली आहे. विजय गायकवाड त्यांनी तात्काळ या हॉटेल वर कारवाई करावी अशी मागणी अर्जात केली आहे. दि प्लेट या हॉटेल मध्ये तारांकित हॉटेल सारखे दर असून पाण्याच्या बाटली साठी प्रति लिटर दर हा 125 रुपये आहे. मात्र तशा कोणत्याही सुबोध हॉटेल प्रशासन यांच्याकडे नाहीत.तर आम्ही अन्न औषध प्रशासनाचा दाखला मागितला असता असा दाखला आपल्याकडे नसल्याचे सांगितले आहे.त्यामुळे आम्ही राज्य सरकारकडे तक्रार केली आहे.शासनाने या हॉटेलची चौकशी करावी आणि कारवाई करावी, अशी तक्रार विजय गायकवाड यांनी केलेली आहे.