माथेरान शहरात नगरपरिषद निवडणूक सुरु असून या निवडणूकीच्या कामासाठी शहरात विद्यार्थ्यी तसेच पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांच्यासाठी असलेल्या ई रिक्षा यांची संख्या कमी करुन 7 ई रिक्षा राखीव ठेवल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे .माथेरानमध्ये सध्या नगरपरिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी 20 पैकी सात ई-रिक्षा घेतल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक आणि स्थानिकांना मोठी गैरसोय होत आहे. शहरात असलेल्या 20 ई-रिक्षा पैकी तीन ई रिक्षा या दुरुस्तीसाठी गेल्यामुळे फक्त 9 ई-रिक्षा उपलब्ध आहेत.त्यातही बॅटरीवर चालणाऱ्या या पर्यावरण पूरक ई रिक्षा असल्याने त्या ई रिक्षा यांना चार्जिंग करावी लागते. दुसरीकडे एकदा बॅटरी डिस्चार्ज झाली की रिचार्ज करण्यासाठी 3ते 4 तास देखील लागतात. कारण ई-रिक्षां सुरु होण्यापूर्वी निवडणूक कर्मचाऱ्यांना टॅक्सी स्टँडवरून चालत जाण्यासाठी कधीही कोणतीही अडचण येत नव्हती. फक्त वाहतुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 7ई-रिक्षा घेतल्यामुळे सेवा देण्यात अडचणी येत आहेत.त्यातही या ई रिक्षा माथेरान शहरातील अनेक रस्त्यांवर चालविल्या जात असून दररोज आलटून पालटून या ई रिक्षा सरकारी यंत्रणेच्या सेवेत असल्याने प्रामुख्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
माथेरान नागरपरिषदेची निवडणूक आता अंतिम टप्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई व खासदार सुनिल तटकरे यांच्या सभा एकाच दिवशी झाल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे मतदारांना आकर्षित करणारे मुद्दे समोर आल्याने प्रचार रंगत चालला आहे. मात्र ई रिक्षाच्या मुद्द्यावरून प्रचाराला गती येऊ लागली आहे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भाषणात सांगितले ई रिक्षा बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची राज्य सरकार तात्काळ अंमलबजावणी करणार आहे. तसेच ई रीक्षा देखील स्वतः राज्य सरकार खरेदी करणार आहे. यामध्ये घोडेवाल्यांचा व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही याची ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली शिवराष्ट्र पॅनल च्या सभेत खासदार सुनिल तटकरे यांनी देखील ई-रिक्षा मुळे येथील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मोठी मदत झाली असून स्थानिक व पर्यटकांची पायपीट वाचली आहे. याचा चांगला परिणाम येथील पर्यटन वाढीसाठी होणार आहे. मात्र या बदलाचा परिणाम येथील आश्वाचालकांवर होणार नाही, याउलट त्यांचा व्यवसाय वाढेल ई रिक्षा पॉईंट वर जाणार नाहीत त्यामुळे त्यांनी निश्चित रहावे हे सांगितले.
माथेरान शहरात अश्वाचालकांची मतदार संख्या मोठी असल्यामुळे त्यांना सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचारात गोंजारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.त्याचेवेळी पर्यावरण पूरक ई रिक्षा मध्ये केवळ 3 प्रवासी बसू शकतात,परंतु निवडणुकीच्या काळात नेत्यांकडून चार पाच प्रवासी बसवून ई रिक्षा चालविल्या जात असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिले जात आहे.
Ans: नगरपरिषद निवडणुकीच्या काळात निवडणूक कामासाठी 20 पैकी 7 ई-रिक्षा शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे शहरात फक्त 9 ई-रिक्षा उपलब्ध असून नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटक यांना मोठी गैरसोय होत आहे.
Ans: एकूण 20 पैकी 7 ई-रिक्षा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी वापरात घेतल्या आहेत.
Ans: ई-रिक्षा दुरुस्तीत आहेत, त्यामुळे प्रत्यक्षात फक्त 9 ई-रिक्षा नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत.






