दिल्ली दौऱ्यानंतर राज ठाकरे-उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा..; शरद पवारांचेही सूचक संकेत
राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्याबाबत सर्वांचे एकमत करण्याचा प्रयत्न सुरू आहेत, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar पवार सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास इंडिया आघाडीला काही अडचण नसल्याचेही म्हटले जात आहे. पण त्याचवेळी राज ठाकरे यांना सोबत घेतल्यास उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतं दुरावण्याची भीती काँग्रेसला आहे. त्यामुळे ठाकरेंबरोबरच्या युतीबाबत काँग्रेसने “योग्य वेळी योग्य निर्णय” घेऊ, अशी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत शिवसेना 84, भाजप 82, मनसे 7, काँग्रेस 31 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा मिळाल्या होत्या.
कमी बजेटमध्ये पूर्ण होईल परदेशी जाण्याचं स्वप्न; अवघ्या 30000 रुपयांत करा या देशांची सफर
हिंदीसक्तीविरोधात एकीचा नारा देणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंनी बेस्टच्या निवडणुकीत युतीची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंच्या अलीकडील दिल्ली दौऱ्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीही ठाकरेंची युती होण्याचे संकेत दिले आहेत.राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्याबाबत एकवाक्यता साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगत सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास इंडिया आघाडीला काही अडचण नसल्याचेही म्हटले जात आहे. मात्र, राज ठाकरे यांना सोबत घेतल्यास उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतं दुरावण्याची भीती काँग्रेसला आहे. त्यामुळे काँग्रेसने “योग्य वेळी योग्य निर्णय” घेण्याची वेट अँड वॉच भूमिका घेतली आहे.
मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत शिवसेना 84, भाजप 82, मनसे 7, काँग्रेस 31 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा मिळाल्या होत्या. मात्र, शिवसेनेच्या फुटीनंतर सध्या उद्धव ठाकरेंकडे 55 तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे 44 माजी नगरसेवक आहेत. मनसेचा मुंबईत एकही नगरसेवक उरलेला नाही. अशा पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे राज ठाकरेंना महाविकास आघाडीत सहभागी करुन घेणार की ठाकरे बंधूंव्यतिरिक्त आघाडीतील इतर पक्ष स्वतंत्रपणे लढून 2019 च्या विधानसभेसारखे निकालानंतर सत्तास्थापनेसाठी एकत्र येणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.






