मुंबई : प्रसिद्ध निर्माता (Producer) आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार (Predsidential Elections Candidate) द्रौपदी मुर्मूविरोधात (Draupadi Murmu) समाज माध्यमावर केलेली टिपण्णीविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्याने वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात (Magistrate’s Court, Bandra, Mumbai) धाव घेतली आहे.
राम गोपाल वर्मा यांनी २२ जून रोजी (एनडीए) आणि विशेषतः भाजप पुरस्कृत राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. त्यानंतर देशभरातील भाजपच्या नेत्यांकडून राम गोपाळ वर्मांविरोधात कारवाई मागणी करण्यात आली होती. मुंबईतील भाजपचे कार्यकर्ते सुभाष राजोरा यांनी वर्मांविरोधात कलम ४९९ आणि ५०० (बदनामी), ५०४ (व्यक्तीचा हेतुपुरस्सर अपमान करणे) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकावण्याची शिक्षा) भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत कारवाईची करण्याची तक्रार महानगर दंडाधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत न्याय दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सुनावणी ११ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.
वर्मा यांची समाज माध्यमांवरील टिपण्णी ही महिलांचा अपमान कणारी असून तसेच अनुसूचित जाती (एससी) लोकांचा अनादर करणारी आहे, असा दावा सुभाष राजोरा यांनी तक्रारीत केला आहे.
राम गोपाल वर्मा यांनी २२ जून रोजी एका ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘जर द्रौपदी राष्ट्रपती असेल तर पांडव कोण आहेत? त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे कौरव कोण आहेत. द्रौपदी मुर्मूचे नाव महाभारतातील पात्रांशी जोडल्याबद्दल राम गोपाल वर्मा यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन भाजपने केले होते.
If DRAUPADI is the PRESIDENT who are the PANDAVAS ? And more importantly, who are the KAURAVAS?
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) June 22, 2022