फोटो - सोशल मीडिया
मुंबई : शिवसेनेमधील बंड हा राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारा मोठा प्रसंग ठरला. शिंदे गटाने आमदारांसह उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केला. सुरत आणि नंतर गुवाहटी असा प्रवास करणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांनी राज्याचे राजकारणाचा आणि सरकारचा पट बदलला. यामुळे उलथापालथ झाली. यांचे नेते म्हणून एकनाथ शिंदे पुढे आले. त्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन करत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. महायुती ही नवीन युती राज्यामध्ये निर्माण झाली. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदार ही घटना कधीच विसरणार आहे. यानंतर आता शिंदे गटातील आमदारांनी तेव्हाचा प्रसंग पुन्हा एकदा सांगितला आहे. उद्धव ठाकरेंना आमदार परत आणण्याचे वचन हा आमदारांनी दिले होते.
मी खोटं बोलत नाही…
उद्धव ठाकरे यांना अवघ्या दोन तासांमध्ये परत आणण्याचे वचन सध्या शिंदे गटामध्ये असणारे रामदास कदम यांनी सांगितले. मात्र यासाठी त्यांनी काही अटी समोर ठेवल्या असल्याचे देखील रामदास कदम यांनी सांगितले. दापोली येथील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी सभेमध्ये रामदास कदम म्हणाले, गद्दारीची व्याख्या काय आहे, हे अनेकांना अद्याप कळलेले नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली. शिवसेनचे आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता. मी खोटं बोलत नाही, गणपतीची शपथ घेऊन सांगतोय. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांना म्हटले की, काँग्रेस पक्षाची साथ सोडा, मी दोन तासांमध्ये सगळे आमदार परत आणतो. पण उद्धव ठाकरे यांनी माझे ऐकले नाही, असा प्रसंग सांगत रामदास कदम यांनी सांगितला आहे.
जो चुकला त्याला सोबत घेऊन जायचं
पुढे रामदास कदम म्हणाले की, शिवसेना का सोडली यावर मी पुस्तक लिहणार. विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. आम्हाला महायुती टिकवायची आहे. जो चुकला त्याला सोबत घेऊन जायचं आहे. आमचं एकच ध्येय आहे. आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला विकास करायचा आहे, असे स्पष्ट मत रामदास कदम यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे यंदाचा त्यांचा भाजपबाबत सूर थोड मावळलेला दिसून आला.