• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • A Series Of Evm Machine Malfunctions In Chiplun Voters Unhappy

Zilla Parishad Election 2026 : चिपळुणात ईव्हीएम मशिनच्या बिघाडाची मालिका; मतदार नाराज

चिपळूण तालुक्यातील ४०-४५ मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेला मोठा फटका बसला आहे. या प्रकारामुळे मतदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 07, 2026 | 03:38 PM
चिपळुणात ईव्हीएम मशिनच्या बिघाडाची मालिका; मतदार नाराज

चिपळुणात ईव्हीएम मशिनच्या बिघाडाची मालिका; मतदार नाराज

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चिपळूण तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गणांसाठी आज शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली असली, तरी सकाळपासूनच ईव्हीएम मशीन बिघाडाचे प्रकार समोर आले आहेत. यामध्ये चिपळूण तालुक्यातील ४०-४५ मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेला मोठा फटका बसला आहे. या प्रकारामुळे मतदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, काही ठिकाणी मतदार मतदान न करताच माघारी फिरल्याचे निराशाजनक चित्र पाहायला मिळाले. या प्रकारावर आमदार शेखर निकम, भाजप नेते प्रशांत यादव यांनी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

खेर्डी जिल्हा परिषद गटामध्ये तब्बल चार ते पाच मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्याने मतदारांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागली. संतप्त मतदारांनी नाराजी व्यक्त करत मतदान केंद्रातून माघार घेतली. यामुळे माघारी फिरलेले मतदार पुन्हा मतदानासाठी येतील का, असा गंभीर व चिंताजनक प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे.

Mumbai Mayor : अखेर भाजपकडून महापौरपदाची घोषणा, तर उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी

तालुक्यातील विविध भागांत ईव्हीएम बिघाडाच्या घटना समोर आल्या आहेत. मालघर येथे बोटाची शाही आपोआप पुसली जात असल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. शिरगावमध्ये सकाळी जवळपास एक तास दोन मशीन बंद अवस्थेत होत्या. सावर्डे कॉलनीत सकाळी ९ वाजता मशीन बंद पडली होती. याशिवाय पिंपळ मोहल्ला, कुडप, गुढेकरवाडी, मांडकी, खरवते, कोंढरताम्हाणे, कापरे, कापसाळ, कळंबस्ते आदी ठिकाणी देखील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. खेर्डी येथे बंद पडलेली मशीन नंतर सुरू करण्यात आली, मात्र तोपर्यंत मतदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.

खेर्डी, पेढांबे, पिंपळी, सती–चिंचघरी, कळवंडे, कुडप, मालघर कोंढे, शिरगाव आदी अनेक गावांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याने निवडणूक यंत्रणेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सकाळच्या टप्प्यात काही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसत होती, मात्र मशीन बंद पडल्याने ही गर्दी संतापात बदलत असल्याचे चित्र होते.

मावळ तालुक्यात शांततेत मतदान; सकाळी 11.30 वाजेपर्यंत 24.45 टक्के मतदानाची नोंद

दरम्यान, या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याशी संपर्क साधला असता, ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे त्या सर्व ठिकाणी तत्काळ जादा ईव्हीएम मशीन पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जवळपास ५० अतिरिक्त ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या असून, भविष्यातील बिघाड टाळण्यासाठी पूर्वतयारी म्हणून प्रत्येक ठिकाणी जादा मशीन सज्ज ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान केंद्रावर हजर राहणाऱ्या सर्व मतदारांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदानाची वेळ वाढविण्यात येईल, असेही लिगाडे यांनी सांगितले. मात्र, सकाळीच मतदान न करता माघारी फिरलेल्या मतदारांचे काय, असा सवाल नागरिक आणि उमेदवारांकडून उपस्थित केला जात असून ईव्हीएम बिघाडाचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: A series of evm machine malfunctions in chiplun voters unhappy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Chiplun
  • EVM
  • Zilla Parishad Election 2026

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “गरज पडल्यास….”; EVM मध्ये बिघाड झाल्यावर रामदास कदम आक्रमक
1

Maharashtra Politics: “गरज पडल्यास….”; EVM मध्ये बिघाड झाल्यावर रामदास कदम आक्रमक

Crime News: चिपळूण एसटी स्टँडमध्ये पाच लाख हातोहात लंपास
2

Crime News: चिपळूण एसटी स्टँडमध्ये पाच लाख हातोहात लंपास

राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह पंचायत समितीसाठी आज मतदान; 7438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…
3

राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह पंचायत समितीसाठी आज मतदान; 7438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…

Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात
4

Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर! शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज; राष्ट्रीय परिषदेत उमटला ठसा

महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर! शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज; राष्ट्रीय परिषदेत उमटला ठसा

Feb 07, 2026 | 05:43 PM
पैसे तयार ठेवा! SBI म्युच्युअल फंडचा मेगा-IPO सप्टेंबर २०२६ येण्याच्या तयारीत, 2200 कोटींचा नफा..

पैसे तयार ठेवा! SBI म्युच्युअल फंडचा मेगा-IPO सप्टेंबर २०२६ येण्याच्या तयारीत, 2200 कोटींचा नफा..

Feb 07, 2026 | 05:33 PM
IND vs USA, T20 World Cup 2026 : वानखेडेवरील खेळपट्टी कुणाला देईल भाव! गोलंदाज की फलंदाज? वाचा सविस्तर माहिती 

IND vs USA, T20 World Cup 2026 : वानखेडेवरील खेळपट्टी कुणाला देईल भाव! गोलंदाज की फलंदाज? वाचा सविस्तर माहिती 

Feb 07, 2026 | 05:28 PM
मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक; दुपारी 3.30 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद

मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक; दुपारी 3.30 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद

Feb 07, 2026 | 05:27 PM
Tata Punch EV Facelift ची लाँच डेट ठरली! ‘या’ दिवशी होणार एन्ट्री; ५०० किमी रेंजसह मिळणार हायटेक फीचर्स

Tata Punch EV Facelift ची लाँच डेट ठरली! ‘या’ दिवशी होणार एन्ट्री; ५०० किमी रेंजसह मिळणार हायटेक फीचर्स

Feb 07, 2026 | 05:18 PM
‘Rang de Basanti’ 20 वर्षांनंतरही जीवंत! राकेश ओमप्रकाश मेहरा टीमसाठी खास स्पेशल स्क्रीनिंग

‘Rang de Basanti’ 20 वर्षांनंतरही जीवंत! राकेश ओमप्रकाश मेहरा टीमसाठी खास स्पेशल स्क्रीनिंग

Feb 07, 2026 | 05:18 PM
CTET Question Paper 2026 : सीटीईटी पेपर-२ वरून गोंधळ, दोन केंद्रांवर परीक्षा रद्द, १५ दिवसांत पुन्हा परीक्षा

CTET Question Paper 2026 : सीटीईटी पेपर-२ वरून गोंधळ, दोन केंद्रांवर परीक्षा रद्द, १५ दिवसांत पुन्हा परीक्षा

Feb 07, 2026 | 05:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.