पदाधिकाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांना रवीकांत तुपकर यांनी इशारा दिला (फोटो - सोशल मीडिया)
सेनगाव पंचायत समितीमध्ये संविधान दिन साजरा न केल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्हिडिओ व्हायरल केला होता. मात्र या प्रकरणात उलट संघटनेच्याच कार्यकर्त्यांवर बदनामी, शासकीय कामात अडथळा आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्यासह तिघांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत रवीकांत तुपकर म्हणाले की, संविधान दिनाच्या कार्यक्रमातील गैरव्यवस्था व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सवाल केले. ही बाब अधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी कार्यकर्त्यांवरच खोटे गुन्हे दाखल केले. “चळवळीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असून पोलिसांनी चौकशी न करता थेट गुन्हा दाखल करणे ही मोठी चूक आहे,” असा आरोप त्यांनी केला.
मागे हटणार नाही
शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला तर जातीच्या आधारावर खोटे गुन्हे दाखल होणार का, असा सवालही तुपकरांनी उपस्थित केला. “जनतेच्या हक्कांसाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना तुपकर म्हणाले, “लवकरच हिंगोलीत येतोय. खोटे गुन्हे करणाऱ्यांना जशास तसे उत्तर मिळणारच!”
हे देखील वाचा : ५ वर्षीय बालिकेचे नेत्रदान! आई- वडिलांचा दुःखातही प्रेरणादायी निर्णय
मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी
राज्य शासनाने राज्यातील नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मतदानाचा दिवस, मंगळवार, दि. २ डिसेंबर, २०२५ रोजी नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद/नगर पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात अधिसूनेद्वारे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सार्वजनिक सुट्टी मतदारसंघाच्या
क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना लागू राहणार असल्याचे अधिसूचनेत नमूद केले आहे.






