फोटो सौजन्य - Social Media
‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या शुभहस्ते ‘गो लाईव्ह’ समारंभ प्रारंभ करण्यात आला होता. यावेळी अनके गृहनिर्माण प्रकल्पांमधील सदनिकांच्या विक्रीकरीता अर्ज नोंदणी व स्वीकृती चालू झाली आहे. यात गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ यांसह विविध विभाग समाविष्ट आहे.
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात जयस्वाल यांनी नागरिकांना म्हाडाच्या सोडतीमध्ये संगणकीय प्रणालीतूनच अर्ज करण्याचे आवाहन केले. सोडतीच्या कालावधीत अनेक फ्रॉड करू पाहणाऱ्यांकडून घर मिळवून देतो अशा प्रलोभनांना बळी न पडता म्हाडाच्या IHLMS 2.0 (MHADA Integrated Housing Lottery Management System) या संगणकीय सिस्टिमच्या माध्यमातूनच सोडतीत सहभाग घ्यावा.
सोडत प्रक्रियेत नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, कागदपत्रांची पात्रता पडताळणी करणे, अर्ज करणे ते अनामत रकमेचा भरणा व सोडतीत घर लागल्यावर सदनिकेच्या रकमेचा भरणा करणे या सर्व बाबी या पूर्णतः ऑनलाइन असणार आहेत.
म्हाडाच्या सोडतीसाठी अधिकृत https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर व MHADA Housing Lottery Management System हे अॅप डाऊनलोड करून त्यावरूनच सोडतीसाठी अर्ज करावा.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाईन अनामत रकमेची स्विकृती दिनांक ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत केली जाणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्यासाठी दिनांक १० सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत केली जाणार आहे. प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार असून सोडतीचे ठिकाण मंडळातर्फे लवकरच जाहीर केले जाईल.