मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll) मोठी चुरस निर्माण झाली आहे. तसेच क्षणाक्षणाला इथली परिस्थिती रंगतदार होत आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट व भाजपा मैदानात उतरले आहेत. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अनेक समस्यांना सामोरी जात तसेच न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर आज लटके यांचा नोकरीचा राजीनामा (Resign) पालिकेनं मंजूर केला. त्यानंतर त्यांनी मविआच्या नेत्यांसोबत अर्ज दाखल केला. यावेळी ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तर भाजप-महायुतीचा उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी देखील उमेदवार अर्ज दाखल केला.
[read_also content=”अनिल देशमुख यांच्यावर जसलोक रुग्णालयात होणार अँजिओग्राफी https://www.navarashtra.com/maharashtra/angiography-will-be-done-on-anil-deshmukh-at-jaslok-hospital-336201.html”]
दरम्यान, ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होणार की नाही, यावर साशंकता निर्माण झाली होती. न्यायालयाच्या दणक्यानंतर पालिकेला राजीनामा मंजूर करावा लागला. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, सहानुभूती मिळवण्यासाठी राजीनामा नाट्य केलं. असा आरोप मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) ठाकरे गटावर केला आहे. पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना अशी आहे. राजीनामा नाट्यातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला, पण अशामुळं निवडणुका जिंकता येत नाहीत. ही निवडणूक सहानुभूतीच्या जोरावर निवडणूक लढवली जात आहे. ऋतुजा लटकेंचा राजीनामा न स्वीकारण्यामागे ठाकरे गटाचं षडयंत्र होतं. असा आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर केला आहे. त्यामुळं ठाकरे गटातून या आरोपाला कसं उत्तर देतात हे पाहवे लागणार आहे.