शरद पवार गटातील नेत्याची टिका (फोटो सौजन्य-X)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी जामनेर इथं बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. रोहित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे स्वतःला अभिमन्यू म्हणतात मात्र देवेंद्र फडणवीस चक्रव्यूहात येऊ शकतात, पण बाहेर येऊ शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस हे अभिमन्यू आहेत की नाही हे मला माहिती नाही . मात्र नवीन युगातील जनरल डायर नक्की आहेत. त्यांनी वारकरी संप्रदायातील लोकांनाही सोडले नाही. त्यामुळे अतिशय चुकीच्या प्रवृत्तीचे हे लोक आहेत. त्यामुळे महायुतीचे नेत्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे, असं रोहित पवार म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची सभा पार पडली, या सभेत बोलताना रोहित पवार यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
जामनेरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. गिरीश महाजन आमदार होऊन मंत्री झाल्यानंतर तुमच्यासाठी काय केले? मोठी खाती त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे जलसंपदा खाते होते. मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी सुजलाम सुफलाम झाले असता. त्यांनी कोणता विकास केला? नुकताच एक व्हिडीओ पाहिला, दुचकीवार बसले होते पण चिखलातून त्यांना जाता आलं नाही. एखाद्या नेत्याचे दर अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांच काय? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
हे सुद्धा वाचा: भाजपची मोठी कारवाई, 37 जागांवर बंडखोरी करणाऱ्या 40 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी
आरोग्यामध्ये मोठं काम केल्याचं ते नेहमी सांगतात. मात्र आरोग्याची सेवा देण्यासाठी बाहेर का घेऊन जातात? याच ठीकाणी असे एखादी हॉस्पीटल का तयार झालं नाही? महाजन हे संकट मोचक नेते आहेत, मात्र संकट कोणाचं सोडवतात, तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर संकट आलं तर ते संकट सोडवतात. संकट मोचक नेते आहे. तुमचं वजन आहे.मग का म्हणून शेतकऱ्यांना अनुदान आलं नाही? सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही तुमचे वजन का वापरत नाही ? हा माझा प्रश्न आहे, असे रोहित पवार म्हणाले.
गिरीश भाऊनी तुमच्या तालुक्यात काही उद्योग आणले का? डिग्री घेऊन तरुणांच्या हाताला काम नाही. महाराष्ट्र आयोगाच्या परीक्षेतही सरकार मोठा भ्रष्टाचार करते आणि भरतीसाठी प्रत्येक व्यक्तीकडून 35 लाख रुपये घेते. देवेंद्र फडणवीस यांना दारातून कंत्राट मिळाले.. 27 हजार कॉन्टॅक्टमध्ये भरती केली कोणाला दिला तर आपल्या भाजपच्या लाडक्या आमदाराला… गोडाऊन भरून भरून पैसा ठेवलेला आहे आणि हा पैसा आपल्या उमेदवाराच्या विरोधात निवडणुकीमध्ये वापरला जाऊ शकता. कितीही पैसा आला तरी आपल्या लाडक्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला विजय करायचा आहे, असं म्हणत फडणवीसांवर रोहित पवारांनी निशाणा साधला आहे.
हे सुद्धा वाचा: 5 महिन्यांपूर्वी जे घडले, तेच पुन्हा घडणार? पवार vs पवार मध्ये कोण जिंकणार?