माळशिरस : माळशिरस तालुक्यातील माळशिरस, नातेपुते नगरपंचायत व अकलूज नगरपरिषदेसाठी माळशिरसचे आ राम सातपुते यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आ रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागामार्फत नगरपंचायत व नगरपरिषदेतील वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी १० कोटीचा निधी मंजूर केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नातेपुते नगरपंचायती साठी 6 कोटी ५ लाख निधी, माळशिरस नगरपंचायती करिता ३ कोटी ९५ लाख रुपये निधी व अकलूज नगरपरिषदेसाठी ३ कोटी १६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. यामध्ये अकलूज नगरपरिषद हद्द्दीत स्ट्रीट लाईट बसवणे, नातेपुते नगरपंचायातीस स्ट्रीट लाईट बसवणे व भूमिगत गटार बांधणे, माळशिरस नगरपंचायतीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, महात्मा फुले उद्यान, विविध सभामंडप, संत सेना भवन या कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
माळशिरस नगरपंचायतीच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले अशा सर्वच महापुरुषांच्या उद्यान विकासासाठी व सुशोभीकरण करण्यासाठी, सभा मंडप व रस्ते दुरुस्तीसाठी भरीव निधीची तरतूद केल्याने माळशिरसकर समाधानी आहेत, असे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी सांगितले.
[blockquote content=” माळशिरसचे आमदार राम सातपुते हसातत्याने माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद करीत आहेत. आमदार सातपुते यांचा माळशिरसचा प्रथम नागरिक या नात्याने सर्व समाजाच्यावतीने सत्कार करणार अाहे. ” pic=”” name=”-आप्पासाहेब देशमुख, नगराध्यक्ष “]