मुंबई : महागाई, गरीबी, बेरोजगारी, वाढती सामाजिक विषमता आणि इतर अनेक मुद्द्यांवर आम्ही पंतप्रधान मोदींशी खुल्या संवादाची मागणी केली असतानाचं आता आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनीही तेच मुद्दे उपस्थित करून ‘मोदीनॉमिक्स’ नाकारले आहेत त्यामुळे त्यांच्या ‘विकासपुरुष’ प्रतिमेला हा धक्का आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार टीका केली आहे.
देशात गरीबी, बेरोजगारी आहे हे शेवटी आरएसएसला लक्षात आलेय, त्यामुळे मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्न विचारावा, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.
[read_also content=”आदिवासी समाज लाचार नाही; शरद पवार यांचे प्रतिपादन https://www.navarashtra.com/maharashtra/tribal-society-is-not-helpless-statement-by-sharad-pawar-nrdm-332365.html”]
भव्य कार्यक्रम आणि प्रसिद्धीवर प्रचंड खर्च करूनही मोदी सरकार मागासलेले, गरीब आणि अल्पभूधारक शेतकरी आणि अगदी लहान व्यावसायिकांशीही ताळमेळ घालू शकलेले नाही. भाजप सरकार केवळ काही निवडक व्यावसायिक घराण्यांसाठी संपत्ती निर्माण करण्याच्या संधी निर्माण करण्यात व्यस्त असल्याचा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.