कल्याण : आरटीओच्या (RTO) भरारी पथकाकडून फक्त रिक्षा चालकांवर (Rickshaw Drivers) कारवाई होते मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) परिवहन सेवेतील अनेक बसेसचे टॅक्स, पीयुसी, इन्शुरन्स, योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या बसेसकडे दुर्लक्ष होत असून त्यांच्यावर कारवाई होत नाही. याबाबत भाजप वाहतूक संघटनेने परिवहन आयुक्तांचे याकडे लक्ष वेधत केडीएमसीच्या परिवहन बसेसवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भाजपा वाहतूक संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक मल्हारी गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विल्सन काळपुंड यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिम अध्यक्ष चंद्रकांत वडतिले यांनी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य, केडीएमसी आयुक्त आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण यांना पत्र दिले आहे.
[read_also content=”आरे कारशेड प्रकरण : अश्विनी भिडेंना पाठविण्यात आलेला संदेश निषेधाचा भाग, उच्च न्यायालयाने नोंदवले निरीक्षण; BKC पोलिसात दाखल केलेला गुन्हा रद्द https://www.navarashtra.com/maharashtra/aarey-carshed-case-message-sent-to-ashwini-bhide-part-of-protest-high-court-observes-case-filed-with-bkc-police-quashed-nrvb-381961.html”]
मागेल त्याला रिक्षा परवाना परिवहन विभागाने दिल्या कारणाने तसेच ओला, उबेर (OLA Uber) मुळे रिक्षा-टॅक्सी चालक बेजार झाला असतानाही रिक्षा टॅक्सचे हप्ते भरून आपले वाहन शक्यतो कागदोपत्री ओके ठेवत आहे. तरी देखील आरटीओचे भरारी पथक रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करत आहे. मोटर वाहन कायदा अधिनियम १९८८ सुधारित १९८९ नुसार कायदा सर्वांना समान असतानाही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन बसेस यांचे टॅक्स भरलेले नाही, पीयुसी नाही, इन्शुरन्स संपलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र संपलेले आहे. यामुळे प्रवाशांचा जीव देखील धोक्यात आहे.
असे असताना देखील परिवहन विभागाकडून त्यांच्या कडे दुर्लक्ष होत आहे. रिक्षा चालक कसं तरी कुटुंबाची उपजीविका संभाळून त्यांचे वाहन व्यवस्थित ठेवत आहे. कोरोना असताना देखील शासनाने रिक्षा चालकांना मदत केलेली नाही. या परिवहन सेवेला शासन तरी मदत करत आहे तरीदेखील हे प्रवाशांच्या जीवाशी खेळतात. त्यामुळे परिवहन विभागामार्फत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून पंधरा दिवसात त्यांच्यावर काय कारवाई केली ते संघटनेला कळवावे.
[read_also content=”प्रशांत दामलेंची वाढदिवसाच्या दिवशी मोठी घोषणा पण… https://www.navarashtra.com/web-stories/marathi-actor-prashant-damle-made-a-big-announcement-on-his-birthday-nrvb/”]
अन्यथा संघटनेच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगर परिवहन सेवेच्या ज्या बसेसचे टॅक्स भरलेले नाहीत. पीयुसी संपलेली आहे योग्यता प्रमाणपत्र संपलेला आहे अशा बसेस वर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.






