विनायकी क्रीडा महोत्सव, पुणे (फोटो- टीम नवराष्ट्र )
विनायकी क्रीडा महोत्सव योनेक्स सनराईज सोमेश्वर चषक 2026
द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण येथे सुरू आहे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा
मुलींच्या गटात मनस्वी गाडेने मिळवला शानदार विजय
पुणे: सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सव योनेक्स सनराईज सोमेश्वर चषक 2026 जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत अक्षत श्रीवास्तव, आदिती खोरगडे, मनस्वी गाडे यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत 13 वर्षाखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित अक्षत श्रीवास्तव याने चौथ्या मानांकित अजिंक्य शिंदेचा 15-07, 15-13 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. याच मुलींच्या गटात आदिती खोरगडे हिने चौथ्या मानांकित अद्विका पाटीलचा 15-11, 15-13 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
17 वर्षाखालील मुलींच्या गटात मनस्वी गाडे हिने दुसऱ्या मानांकित अवनी मुसळेवर 15-12, 09-15, 15-09 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. 15 वर्षाखालील मुलांच्या गटात ओम केनेने स्वरूप कल्याणकरचा 15-12, 12-15, 15-04 असा तर, चौथ्या मानांकित अक्षत नायक याने स्तव्य सिद्धार्थचा 12-15, 15-09, 15-09 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
17 वर्षीय Tanvi Sharma ची कमाल! Taipei Open 2026 जिंकून संपवला 18 वर्षांचा दुष्काळ
निकाल: 13 वर्षाखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी
स्तव्य सिद्धार्थ(1) वि.वि.आदित्य शिंदे 15-10, 15-09;
अक्षत श्रीवास्तव वि.वि.अजिंक्य शिंदे(4)15-07, 15-13;
शुभ हेमनानी वि.वि.शर्वीन नागर 15-12, 17-15;
कैवल्य मेहेत्रे(2) वि.वि.मनन 15-07, 15-05;
13 वर्षाखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी
प्रत्यशा दलाई(1) वि.वि.शिवांशी आंबटकर 15-08, 13-15, 15-10;
आदिती खोरगडे वि.वि.अद्विका पाटील(4)15-11, 15-13;
आराध्या लोहार(3) वि.वि.अन्या हळदणकर 15-10, 15-10;
तेजश्री शेंडे(2) वि.वि.आर्णा कालवय 15-09, 15-08;
15 वर्षाखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी
ओम केने वि.वि.स्वरूप कल्याणकर 15-12, 12-15, 15-04;
कृष्णा पंधरवडा वि.वि.तनय बोडस 15-09, 06-15, 15-05;
अक्षत नायक(4)वि.वि.स्तव्य सिद्धार्थ 12-15, 15-09, 15-09;
अवनीश भालचंद्र(2) वि.वि.सुधन्वा कुलकर्णी 15-09, 15-05;
15 वर्षाखालील मुली
तन्वी बोरीकर(1) वि.वि.आध्या सिंग 15-03, 15-08;
प्रत्यशा दलाई(4) वि.वि.आराध्या जोशी 15-08, 16-14;
आदित्री चौधरी(3) वि.वि.केके सिंग 15-08, 15-06;
मनस्वी राऊत(2) वि.वि.मुदिता वायकोले 15-11, 15-09
17 वर्षाखालील मुले:
वत्सल तिवारी वि.वि.आराध्या गव्हाणकर 15-09, 15-13;
विघ्नेश सुतार वि.वि.कृष्णा पंधरवडा 15-11, 15-10;
साकार धाकटे(2) वि.वि.अवनीश बालचंद्र 15-11, 15-13;
17 वर्षाखालील मुली:
अरुंधती कोंवर(1) वि.वि.अन्वेषा असती 15-02, 15-01;
आदित्री चौधरी वि.वि.अनन्या कामत 15-08, 13-15, 15-13;
मनस्वी राऊत वि.वि.आराध्या जोशी 13-15, 15-13, 15-08;
मनस्वी गाडे वि.वि.अवनी मुसळे(2)15-12, 09-15, 15-09.






