मुंबई : मुंबई विद्यापीठ, पालि विभागातील पालि भाषा आणि बौध्द कला शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने “सम्मुतिसच्च” या मथळ्याखाली “प्रतिकात्मकाद्वारे बौध्द कलेचे दर्शन ” यावर नेहरू सेंटर, मुंबई येथे चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी ख्यातनाम चित्रकार विलास शिंदे (भारत) तसेच जिनसुक शिंदे (कोरिया), पालि विभाग प्रमुख डॉ योजना भगत, प्रा.विनोद भेले, सुनिल कांबळे सर,सुरेश माटे सर, लक्ष्मण सोनावणे सर,आदींची उपस्थित होते.
बौध्द प्रतीकांद्वारे बौध्द कला संपूर्ण जगभरात मोठ्याप्रमाणात अभ्यासली जात असून या क्षेत्रात विद्यार्थ्याना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. यासाठी मुंबई विद्यापीठात या विषयावर एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू आहे, असे पालि भाषा विभाग प्रमुख, डॉ योजना भगत म्हणाल्या. यावेळी मुंबई विद्यापीठातील पालि विभागातील “पालि भाषा आणि बौध्द कला” या एक वर्षीय पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी, बौध्द प्रतीकांद्वारे अभिव्यक्त होणारी बौध्द कला या विषयांवर आपापल्या चित्रांद्वारे, प्रदर्शन सादर केले.
1.संदीप भगत – अरुपावचर लोक
2.प्रज्ञा गाणार – अनुसासन पाटिहारिय
3.सीमा गोंडाणे – चतुसंवेजनियसिद्धी
4.सुभाष शेगोकार – असोकस्स धम्मसासन
5.गोरख घोलप – पटिसंधि
6.ज्ञानज्योती बोदडे – विमुत्तिसुख
7.अंजली क्षीरसागर – सन्दिट्ठिको
आदींनी आपली प्रतीकांद्वारे बौद्ध चित्रकला सादर केली. सदरील ” सम्मुतिसच्च ” हे चित्रप्रदर्शन नेहरू सेंटर येथील सर्क्युलर आर्ट गॅलरी, डॉ. ऍनी बेझंट रोड, वरळी मुंबई याठिकाणी आयोजित केलेले असून 5 ऑगस्टपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहॆ.