समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) बुलढाण्यात झालेल्या अपघाताने महाराष्ट्र हादरून गेला आहे. या अपघातात 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या मृतांचा अक्षरश: कोळसा झाल्याने त्यांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. त्यामुळे आज त्यांच्यावर बुलडाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार केले जाणार आहे. बुलडाण्यातील त्रिशरण चौकातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. यातच आता अंत्ययात्रेची तयारी सुरू असताना नातेवाईकांचा एकच आक्रोश सुरू आहे. मन हेलावणारी अशी दृश्य याठिकाणी पाहायला मिळत आहेत.
[read_also content=”ट्विटरचा पुन्हा नवा नियम! आता Twitter वर दिवसाला वाचता येणार फक्त 600 पोस्ट https://www.navarashtra.com/india/twitter-new-rule-now-only-600-posts-can-be-read-per-day-on-twitter-nrps-426148.html”]
या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात होरपळले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात अडचण येत आहे. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांशी चर्चा करून रविवारी बुलढाण्यात त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, समृद्धी मार्गावरील अपघात हा दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात अतिवेग आणि वाहनचालकांना आलेली डुलकी आदी कारणामुळे घडतात. असे अपघात घडू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्या शासन स्तरावरून गांभीर्यपूर्वक व प्राधान्याने करण्यात येतील.
‘समृद्धीवरचे अपघात जास्तीत जास्त मानवी चुका, चालकांच्या चुकांमुळे झाले आहेत. असे अपघात होऊन चालणार नाही. आपल्याला प्रत्येक जीवाची काळजी आहे, त्यामुळे सरकारने प्रकरण गांभिर्याने घेतलं आहे. सगळी यंत्रणा जागेवर पोहोचली मात्र दरवाजा बंद असल्यामुळे त्यांना बाहेर येता आलं नाही. अपघात होऊ नये म्हणून सरकारला काही करायला हवं ते सरकार करेल,’ असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.
कसा झाला अपघात ?
विदर्भ टॅव्हल्सची (Vidharbh Bus Accident) खासगी बस नागपूरहून पुण्याकडे (Pune) निघाली होती. या बसमध्ये दोन चालक होते. मध्यरात्री 1.30 वाजता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ बसचा भयंकर अपघात झाला. बस आधी एका खांबाला जावून आदळली आणि त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली. डीझेल टाकी फुटल्याने बसने पेट घेतला.
आगीने बघात बघता रौद्ररूप धारण केलं. या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. बसमधील 26 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. या बसचा एक चालक दगावला आहे. तर दुसरा चालक शेख दानिश शेख इस्माईल हा बचावला आहे. (Buldhana Bus Accident)