मुंबई : अखेर शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला आहे. यामध्ये शिंदे गटाच्या 9 नेत्यांना मंत्रीपद मिळालं आहे. यामध्ये माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचाही समावेश आहे. ज्या संजय राठोडांविरोधात राळ उठवून उद्धव ठाकरेंना त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यास भाग पाडले होते, तेच राठोड शिंदेंच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले आहेत. मागच्या वर्षी एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी त्यांच नाव चागंलच चर्चेत आलं होत.
[read_also content=”शिंदे – फडणवीसांचं पुरुषप्रधान मंत्रिमंडळ, महिला आमदारांचा पडला विसर https://www.navarashtra.com/maharashtra/not-a-single-woman-mla-included-in-shinde-fadnavis-cabinet-nrsr-313843.html”]
महाराष्ट्र सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. यामध्ये मागील सरकार मधील ‘पूजा चव्हाण’ मृत्यूप्रकरणी अडचणी वाढल्याने राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे.
एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात गेली वर्षभर चहुबाजूंनी होणारे आरोप, ठाकरे सरकारमध्ये असताना वनमंत्रीपदाचा द्यावा लागलेला राजीनामा, चौकशीचा सुरु झालेला ससेमिरा हे सगळं बाजूला सारुन राज्यातल्या सत्तातरानंतर संजय राठोडांना (Sanjay Rathod) तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात क्लिनचिट मिळाली आणि नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदी संधीही दिली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर सुरुवातीपासूनच संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले होते. एकनाथ शिंदे सुरतला निघून जाण्यापूर्वी संजय राठोड हे सतत त्यांच्यासोबत वावरत होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांचे मंत्रिपद पक्के मानले जात होते.
[read_also content=”पूजा चव्हाण प्रकरणातील राठोड यांच्याविरूद्धचा लढा चालूच राहील https://www.navarashtra.com/maharashtra/the-fight-against-rathore-in-the-pooja-chavan-case-will-continue-nrgm-313856.html”]