मुंबई : सध्या देशात एका वेगळ्या कारणावरुन वातावरण तापले आहे. आणि याला जबाबदार आहे केंद्र सरकारने (Central Government) आणलेली नवी अग्निपथ योजना (Agneepath Scheme) देशातील विविध राज्यांनी (State) या योजनेला विरोध केला. भारतीय सैन्यदलांत (Indian Army) १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर (Agneeveer) म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. मात्र तरुणांचा रोष पाहता केंद्र सरकारने (Central Government) एक पाऊल मागे घेतलं आहे. वयोमर्यादा २१ वरुन २३ केली आहे. तसेच वाढता विरोध लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालयाने (Central Home minister depertment) सुद्धा यात बदल केल्याची माहिती समोर येत आहे. (Major changes in the Agneepath scheme) दरम्यान, या योजनेवर टिका होत असताना, शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Shivsena MP Sanjay Raut) सुद्धा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
[read_also content=”अग्निपथ योजनेत मोठा बदल, सीआरपीएफ आणि आसाम रायफल्ससाठी महत्त्वाचा निर्णय https://www.navarashtra.com/india/important-decision-for-crpf-and-assam-rifles-by-home-ministry-in-agneepath-yojana-293925.html”]
दरम्यान, सैन्यामध्ये ठेकेदारी पद्धतीने भरती (Contract Recruitment) होणार असेल तर देशात भारतीय सैन्याची जी प्रतिष्ठा आहे, ती रसातळाला जाईल. सैन्य पोटावर चालतं, सैन्याला एक शिस्त असते. ठेकेदारीवर (Contractor) गुलाम किंवा सध्याचा मीडिया (Media) घेतला जाऊ शकतो. पण सैन्य कंत्राटी पद्धतीने कसं काय घेतलं जाऊ शकतं? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. “ज्यांच्यावर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्यांना चार वर्षांसाठी ठेकेदारी पद्धतीने नोकरीवर ठेवणं हा राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान आहे,” असंही राऊत (Sanjay Raut) यांनी म्हणच मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
मोदी सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडत आहे, मोदींच्या प्रत्येक योजना अपयशी ठरत आहेत, आधी 10 लाख 20 तसेच 10 कोटी 20 कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती, त्या घोषणेचं काय झालं? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तसेच महागाईवरील दुर्लक्ष हटविण्यासाठी अग्निपथ योजना आणली असल्याची टिका राऊतांनी केली. अग्निवीरांना दोन दलात भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा ३ वर्षाची सूट दिली जाणार आहे. म्हणजे वयोमर्यादा २१ वरुन २३ केली आहे. तर, अग्निवीरांच्या पहिल्या तुडकीसाठी उच्च वयोमर्यादेच्या पुढे ५ वर्षांसाठी वयोमर्यादा शिथिल असेल असंही गृह मंत्रालयाने म्हटलं आहे. (Major changes in the Agneepath scheme)
नेमकी काय आहे अग्निपथ योजना?
भारतीय सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. चार वर्षांच्या कालावधीसाठी (प्रशिक्षण काळासह) तरुणांना समाविष्ट केलं जाईल. महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतन (लागू असल्यास स्वतंत्र भत्ता) मिळणार आहे. वेतनात दर वर्षी काहीअंशी वाढ होईल. प्रत्येक अग्निवीरास मासिक वेतनातील ३० टक्के रक्कम अग्निवीर समूह निधीत द्यावी लागेल. यातून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत ११.७१ लाख रुपये मिळतील, जे करमुक्त असतील.