मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात सोमवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याबाबतचा व्हिडिओ ट्विट करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर आता मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर हल्लाबोल केला.
संजय राऊत यांनी केलेले सर्व आरोप कंबोज यांनी खोडून काढले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘संजय राऊत मानसिक संतुलन गेलंय. ते तुरुंगातून आल्यानंतर वेडे झालेत. मी जर व्हिडिओ लावणे सुरु केलं तर महाराष्ट्रातील बड्या-बड्या नेत्यांना तोंड दाखवता येणार नाही. ही मग धमकी समजा किंवा काहीही. मी जे काही बोलतो ते पुराव्यानिशी बोलतो. तुम्ही आता जे राजकारण करताय ते मी राजकारण केले तर तोंड दाखवता येणार नाही’.
मी ड्रग्ज घेतले नव्हते
मी कोणत्याही प्रकारे ड्रग्ज घेतले नव्हते. मी माझ्या बायकोसोबत होतो. त्यावेळी मी ड्रग्ज घेतले नव्हते. पण संजय राऊत काय-काय करतात हे सांगितलं तर ते तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
आरोप पुराव्यांसह करावेत
राजकारण हे राजकारण म्हणून करा. आरोप करताना पुराव्यासह करावेत. पुराव्याविना आरोप करू नयेत. मी जेव्हा काही बोलतो ते पुराव्यानिशी बोलतो. मलाही राजकारण करायला येतं. मी गौप्यस्फोट करणार तेव्हा महाराष्ट्र हादरेल. मला जसाशच तसे उत्तर द्यायला येतं. पण मी मर्यादा पाळतो, असे म्हणत संजय राऊतांबाबत म्हणाले, ‘ते संपादक नाहीत तर नुसते पादक आहेत. माझ्यावर यालं तर खबरदार’, असेही त्यांनी म्हटले आहे.