मुंबई : भीमा कोरेगाव येथे घडलेल्या हिंसाचार प्रकरणाची (Bhima Koregaon Case) चौकशी करणाऱ्या आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे (Rashtrawadi Congress) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हजेरी लावण्याची शक्यता कमी आहे. तसा अर्ज त्यांच्यावतीने आयोगाकडे दाखल करण्यात आला असून आयोगानेही त्यांचा अर्ज स्विकारला आहे. आयोगाकडून जारी केलेल्या वेळापत्रकानुसार येत्या २३ आणि २४ फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहणार होते.
[read_also content=”घराशेजारी सुरु होता दारू अड्डा; तक्रार करून ही दखल न घेतल्याने संतापलेल्या महिलांनी हातात हातोडा घेतला आणि… https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/solapur/the-liquor-store-starts-next-door-the-enraged-women-took-a-hammer-in-their-hands-nrvk-243495.html”]
पुण्यातील (Pune) कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी २०१८ मध्ये घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. पुणे जिह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे (NIA) सोपवला असला तरी चौकशी आयोगाचे कामकाज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सुरूच आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या हिंसाचाराला आधी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी तिथले वातावरण बिघडवले होते. तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा तपास यात कमालीचा विरोधाभास आहे. असे पवार यांनी म्हटले होते. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची साक्षही चौकशी आयोगाने नोंदवली पाहिजे अशी मागणी करणारा अर्ज विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे केला होता.
या घटनेनंतर पवारांनी माध्यमांत केलेल्या काही विधानांवरून या घटनेसंदर्भात पवारांकडे काही अधिकची माहिती उपलब्ध असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले होते. त्याची दखल घेत आयोगाने शरद पवार यांना २३ आणि २४ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे बोलावणे पाठवले होते. मात्र, पवारांकडून अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेल देण्याची विनंती करणारा अर्ज आयोगाकडे करण्यात आला तो न्या. जे. एन. पटेल यांनी स्विकारला. त्यामुळे आता बुधवारी होणाऱ्या आयोगाच्या सुनावणीदरम्यान पवारांची साक्ष होणार नाही.