औरंगाबाद : औरंगाबादमध्ये शिवसेना आणखी एक धक्का बसला आहे. औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नरेंद्र त्रिवेदी हे गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होतेतर नरेंद्र त्रिवेदी यांच्यासोबत फुलंब्री तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, कृउबा सभापती चंद्रकांत जाधव यांनीही गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्रिवेदी यांच्याकडे पैठण, फुलंब्री, सिल्लोड या मतदारसंघात संघटन करण्याची जबाबदारी होती.
[read_also content=”डोंबिवलीत दहीहांडी उत्सावाला हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्र्याचा बोटीतून प्रवास https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/cm-eknath-shinde-arrived-in-dombivli-at-1130-pmby-boat-nrps-317917.html”]
यापुर्वी सिल्लोड व पैठण मतदारसंघातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री भुमरे हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आता आता शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात गेल्याने औरंगाबादमध्ये शिवसेना हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.